चला सांगोला शहरात प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूया-मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी

सांगोला / तालुका प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण २.० व माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी प्रदूषण मुक्त पर्यावरण पूरक दिवाळी साजरे करण्याचे आवाहन सांगोला शहरातील नागरिकांना केले आहे.
फटाक्यांमधून विषारी वायू शोभेच्या दारूतून निर्माण होतात व हे वायू मानवी जीवनाला अतिशय घातक असतात हृदयरोग, रक्तदाब ,अस्थमा असणाऱ्यांना हे तर जास्त घातक आहेच परंतु याबरोबर गर्भवती स्त्रिया ,वृद्ध माणसे, लहान बालके यांना सुद्धा फटाक्यांपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा जास्त धोका आहे फटाके वाजवताना सर्वसाधारण निरोगी व्यक्तींनाही अपचन, सर्दी खोकला, मानसिक अशांती ,डोके दुखणे या व्याधी होतात फटाके लावताना होणारी इजा वा अपघात हा चिंतेचा विषय आहे.
शहरात फटाक्यांपासून प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण निर्माण होते वायू प्रदूषण निर्माण होते त्यापासून अनेक जणांना त्रास होतो व सदर बाब ही पर्यावरणाला पूरक नसून प्रदूषण करणारी आहे त्यामुळे सांगोला शहरातील प्रत्येक नागरिकांनी दिवाळी साजरी करताना प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी कशी होईल यावर भर देऊन आपले सण मोठ्या उत्साहात साजरे करायचे आहेत तसेच सांगोला शहररात प्लास्टिक बंदी मोहीम राबवली जात असून सांगोला शहरातील नागरिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दिवाळी साजरी करावी असे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी सांगितले आहे