पोलिस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या टीम ची उल्लेखनीय कामगिरी.
सोने चोरी, ट्रॅक्टर चोरी करणा-या टोळीस जेरबंद करण्यात सांगोला पोलिसांना यश.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागातील चोरी घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणणेकरीता सांगोला पोलीस ठाणे कडील तपास पथक नेमुन पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे यांना दिलेले सुचना प्रमाणे सांगोला पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यामध्ये मुक्ताई मंगल कार्यालय शिवणे ता. सांगोला येथे लग्नकार्याचे वेळी फिर्यादी विद्या अविनाश लेंडवे (रा. आंधळगांव, ता. मंगळवेढा) यांचे पर्स मधून सुमारे २३ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरी झाले बाबत गुन्हा दाखल होता.
तसेच सांगोला शहरातील कडलास नाका सांगोला येथे लावण्यात आलेला फिर्यादी रविंद्र महांकाळ (रा. कडलास.ता.सांगोला) यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम एच ४५ ए क्यू ६८२३ असे चोरी झाले बाबत सांगोला पोलीस ठाणेस अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हे दाखल होते.
सदरच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुंशगाने सांगोला पोलीस ठाणेस वरील दाखल गुन्ह्यांचा तपास करीता असताना तांत्रिक व सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे मंगल कार्यालय येथे चोरी करणारे आरोपी हे सांगोला पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता त्याचे नांव १) नईम तांबोळी (रा. दिघंची ता. आटपाडी) सध्या रा. कडलास रोड सांगोला २) सुहानी सावंत (रा.सांगोला ता. सांगोला) यांची नावे निष्पन्न करुन त्यातील आरोपी नईम तांबोळी यास अटक करण्यात आली आहे. तसेच नईम तांबोळी याने पोलीस चौकशी दरम्यान कडलास नाका सांगोला येथुन फिर्यादी रविंद्र विठठल महंकाळ (रा. कडलास.ता.सांगोला) यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम एच ४५ ए क्यू ६८२३ हा त्याचा मित्र बबलु भोसले (रा. सांगोला, ता. सांगोला) याचे सोबत मिळून चोरी केल्याचे कबुली दिल्याने आरोपी नईम तांबोळी याचेकडून सदरचा ट्रॅक्टर व सोन्याचे गंठण असा सुमारे ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी. (पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) प्रितम यावलकर (अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) विक्रांत गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा) भिमराव खणदाळे. (पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ अस्लम काझी, पो.ना.बाबासाहेब पाटील, पो.ना. वाकीटोळ, पो.कॉ लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पो.हे.कॉ युसूफ पठाण यांनी मदत केली आहे.
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या असून पोलीस अंमलदाराची प्रभावी गस्त करण्यात येत असुन पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी रात्रगस्त, नाकाबंदी नेमण्यात येते यामुळे काही दिवसापासून अशा प्रकारच्या चोरीच्या घटनाना आळा बसला असुन यापुढे ही प्रभावी गस्त ठेवण्यात येणार आहे व तसेच सांगोला शहर आठवडा बाजारामध्ये मोबाईल चोरी बाबत पोलीसांनी साध्या वेशात गस्त ठेवत मोबाईल चोरी घटनावर प्रतिबंध करीत आहोत.
भिमराव खणदाळे.
पोलीस निरीक्षक.
सांगोला पोलीस ठाणे.