दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे पुन्हा ॲक्शन मोडवर; सांगोला शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू.!

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला शहरातील मुख्य चौकामध्ये झालेल्या अतिक्रमण मुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या तसेच रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांचे छोटे-मोठे अपघात देखील होत होते.
त्यामुळे मुख्य चौकातील अतिक्रमण हे वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने सांगोला शहरातील कडलास नाका व वाढेगाव नाका येथील अतिक्रमण काढण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी फौजफाट्यासह स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केली यावेळी जेसीबीच्या साह्याने या दोन चौकामधील अतिक्रमण असलेल्या आस्थापनावर धडक कारवाई केल्याने या चौकांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे दिसत आहे.
सांगोला शहर व तालुक्यातील मुख्य चौकामध्ये रहदारीला अडथळा येईल अशाप्रकारे कोणीही अतिक्रमण करू नये अशा प्रकारचे अतिक्रमण आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे.