Sangola
दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची घेरडी दुरक्षेत्रात कारवाई;बेशिस्त वाहनधारकांवर केल्या कारवाया.!

सांगोला / प्रतिनिधी
सांगोला पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पदभार घेतल्यापासून तालुक्यातील विविध भागात कारवाईचा धडाका लावला आहे त्याचाच एक भाग म्हणून दि.०५ मे सोमवार रोजी सायंकाळी ६ ते.८:३० वाजण्याच्या दरम्यान घेरडी दुरक्षेत्र हद्दीतील जवळा, ता. सांगोला येथे ४ पोलीस अधिकारी, १७ पोलीस अंमलदार व २ वाहतुक अंमलदार अशा फौज-फाट्यासह जाऊन अचानक नाकाबंदी केली. तसेच जवळा ते सांगोला, जवळा ते घेरडी, जवळा ते सोनंद या मुख्य रस्त्यावरील हॉकर्स, अतिक्रमण केलेले इसमांना काढून घेण्याची समज दिली सदर नाकाबंदी दरम्यान ट्रिपल सीट, विना नंबर प्लेट, रस्त्यावरील लावलेली वाहने यावर दंडात्मक कारवाई करून बेशिस्त वाहन चालकांवर ३८ केसेस करत २८ हजार रुपयांचा दंड केला आहे.