अवैध धंद्यांचा कर्दनकाळ; दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे.
धडक कारवायांनी अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले.!

सांगोला / तालुका प्रतिनिधी
दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला शहर व तालुक्यामध्ये अवैध धंद्यावर धडक कारवाया करण्यात आल्या आहेत काल बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाया पुढीलप्रमाणे…
मौजे भाळेवाडी ता. सांगोला येथील अवैध दारु आड्यावर छापा टाकुन केला २ लाख ५८ हजार ७२०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे सांगोला पोलीस ठाणे यांनी श्रेणी पो.स.ई हिप्परकर, पो.कॉ धुळदेव चोरमुले, पो.कॉ सद्दाम नदाफ यांना त्यांचे कार्यालयात बोलावून घेवून कळविले की, सांगोला पोलीस ठाणे हददीतील नाझरा शिवारात भाळेवाडी येथे एक इसम पत्रा शेडमध्ये अवैध दारूची विक्री करीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाली आहे. तरी आपण सर्वजण वरील ठिकाणी जावून बातमीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
सदर आदेशान्वये नाझरे येथे छापा टाकला असता सतिश सदाशिव आदट (वय ४३ वर्षे रा-नाझरा ता. सांगोला) यांच्याकडे चौकशी करून पत्राशेडची झडती घेतली असता खालील अवैध्य प्रोव्हीबिशन माल मिळुन आलेला आहे.
२ लाख ५८ हजार ७२० रुपये किमतीचे देशी विदेशी कंपनीचे दारूचे ७७ बॉक्स अवैध्य दारु हस्तगत करण्यात आले आहे.
तसेच सांगोला पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने अवैध्य दारु वाहतुक करणाऱ्या वाहनासह ६ लाख २२ हजार ७५४ रुपयाचा मुद्देमाल केला जप्त आहे सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सांगोला शहरातून अवैध दारूची विक्री करण्याकरीता वाहतूक केली जात असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमीची खातरजमा करून कारवाई करावयची आहे. म्हणून लागलीच सर्व पोलीस अंमलदार एका खाजगी वाहनाने, दोन पंचाना बोलावून वरील मजकूराचा आशय त्यांना समजावून सांगितला. त्यानंतर वरील पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने सांगोला शहरालगत असलेल्या पंढरपूर ते सांगोला रोडवरील नॅशनल हायवे क्र. १६६ च्या ब्रिजखाली रोडच्या बाजूला आमचे वाहन लावून थांबले काही वेळाने त्याठिकाणी एक पांढ-या रंगाची बोलेरो जीप गाडी आली त्यावेळी त्यांना प्रोव्ही गुन्ह्याचा माल असल्याचा संशय असल्याने त्या वाहनास त्यांनी हात करून थांबविले व त्यातील चालकाला गाडीच्या खाली उत्तरावून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव प्रकाश चुडाप्पा शिंदे वय ४३ वर्षे रा. मेडशिंगी ता. सांगोला जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यावर पोलीसांनी गाडीमध्ये काय आहे? असे विचारले असता प्रकाश शिंदे यांनी गाडीमध्ये दारु असल्याचे सांगीतले.सदर वाहना मध्ये १ लाख ७२ हजार ७५४ रुपये किमतीचे देशी विदेशी कंपनीची अवैध्य दारुचे बॉक्स ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा
एक पांढ-या रंगाची बोलेरो जीप असा एकूण ६ लाख २२ हजार ७५४ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पो.कॉ. सद्दाम नदाफ यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून याबाबत पुढील तपास पो.स.ई. हिप्परकर करत आहेत.
नुकतेच सांगोला पोलीस स्टेशनचे पदभार स्वीकारलेले नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले असल्याचे पाहायला मिळत आहे.