वाढदिवसानिमित्त विजय चव्हाण सांगलीकर यांच्याकडून आपुलकी प्रतिष्ठानला देणगी.
सांगोला : प्रतिनिधी
आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी श्री. विजय चव्हाण सांगलीकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ५ हजार रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सांगोला कडलास रोडवर सांगलीकर बंगला येथे वास्तव्यास असलेले, सामाजिक कार्याची आवड असणारे तसेच एअर इंडिया मध्ये ३६ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झालेले श्री. विजय चव्हाण सांगलीकर यांनी आपल्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रगणी असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान या संस्थेला ५ हजार रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. वाढदिवसानिमित्त आपुलकी सदस्यांनी चव्हाण यांना गुलाब रोप भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, प्रा. डॉ. विधिन कांबळे, महादेव दिवटे, अच्युत फुले, अरविंद डोंबे गुरुजी, प्रा. डॉ. रमेश बुगड, दादा खडतरे, श्रीकांतकाका देशपांडे, चंद्रशेखर कवडे, प्रमोद दौंडे, सौ. वनिता विजय चव्हाण उपस्थित होते.