घरकुलधारकांना मिळणार मोफत वाळू; लहुजी पॅंथर सेनेच्या आंदोलनाला यश:- नितीनभाऊ रणदिवे.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणारी संघटना म्हणजे लहुजी पॅंथर संघटना या संघटनेचे संस्थापक ऍड.अभिषेक कांबळे आणि अध्यक्ष नितीन रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित उपेक्षित घटकाच्या प्रश्नांबाबत शासन दरबारी न्याय मिळावा अशा विविध मागण्यासाठी दि.१२ मार्च २०२५ रोजी पंचायत समिती सांगोला येथे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी म्हणजे तालुक्यातील घरकुलधारकांना मोफत वाळू मिळावी या मागणीसाठी आंदोलन करत लोकशाही मार्गाने संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांनी शासन दरबारी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता दरम्यान त्यांच्या या मागणीला यश आले आहे उद्या शुक्रवार. दि. २०जून रोजी वाणीचिंचाळे ता. सांगोला येथील घरकुलधारकांना मोफत वाळू देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांनी दिली तसेच आंदोलनामधील इतरही मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरूच राहणार असून वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढायला देखील लहुजी पॅंथर सेना मागे पुढे पाहणार नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांनी यावेळी ठासून सांगितले.