सोलापूर

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा वार्षीक तपासणी कार्यक्रम.

उत्कृष्ठ कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार

सोलापूर / विशेष प्रतिनिधी

मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर हे सोलापूर ग्रामीण पोलीस घटकाचे वार्षीक तपासणीच्या दौऱ्यावर असून दि. १६.०६.२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सोलापूर ग्रामीण या कार्यालयाची वार्षीक तपासणी घेतली आहे.
आज दिनांक १७.०६.२०२५ रोजी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सिरोमनियल परेड करीता हजर राहून परेडचे निरीक्षक केले. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अडचणींवर उपाय योजना करण्यासाठी सैनिक संम्मेलामध्ये हजर राहीले आहेत.
या वार्षीक तपासणी कार्यक्रमामध्ये आयोजीत गुन्हे सभेच्यावेळी सोलापूर ग्रामीण घटकामध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यापैकी उत्कृष्ठ कामगिरी करणारे पदक व पुरस्कार प्राप्त अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार केला. सत्कार प्राप्त अधिकारी व अंमलदार यांची नावे व कामगिरी पुढीलप्रमाणे:-
१) श्री. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेमणूकीस असताना सुपा पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं.४७८/२०२० भा.द.वि.क.३०२ या खूनाच्या गुन्ह्याचा तपास त्यांनी केला होता. त्यामध्ये अज्ञात तरूणांनी गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून एका महिलेची निघृण हत्या केली होती. श्री पाटील यांनी सदर अज्ञात आरोपींचा शोध अतिशय तांत्रीक व कुशलतेने घेवून अवघ्या २ दिवसामध्ये ५ आरोपींना अटक केली होती. तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीस १०२ दिवसांनी हैद्राबाद येथून अटक केली होती. या कामगिरीबद्दल त्यांना “मा. केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ठ गुन्हे अन्वेषण पदक” प्राप्त झाले आहे.
२) श्री. मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक, मंद्रुप पोलीस ठाणे हे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वेल्हे पोलीस ठाणे येथे नेमणूकीस असताना अज्ञात आरोपीने अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करून मृतदेह रस्त्यावरील पुलाखाली पाईमध्ये टाकून दिला होता. तपासी अधिकारी सपोनि पवार यांनी फॉरेन्सीक टीम, श्वान पथक यांच्या मदतीने पुरवे प्राप्त करून आरोपीस अटक केली होती. सदर आरोपीविरूध्द दोषारोप पत्र दाखल केले होते. यामध्ये आरोपीस मा. न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या कामगिरीबद्दल त्यांना “मा. केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ठ गुन्हे अन्वेषण पदक” प्राप्त झाले आहे.
३) श्रीमती सुरेखा शिंदे, मपोसई व मपोकों/१९१३ शिंदे, भरोसा सेल, सोलापूर ग्रामीण घटकामध्ये बालविवाह प्रतिबंधक योजना राबविण्यात आली असून त्यामध्ये जिल्ह्यातील ४७० गावामधील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत बालविवाह विरूध्द ठराव पास केला आहे. या योजनेमध्ये एकूण १०९ बालविवाह रोखण्यात आले आहेत, त्याच्या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून त्यांना ” बालस्नेही पुरस्कार – २०२४” देवून गौरविण्यात आले आहे.
४) श्वान पथकातील टेरी व जिमी श्वान सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्निपर डॉग टेरी व जिमी यांनी मागील वर्षी” कोल्हापूर परिक्षेत्रीय व महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा “मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले होते. तसेच या श्वानांनी आखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळामध्ये अनुक्रमे ५ वा व ७ वा. क्रमांक प्राप्त केला आहे. याबध्दल या श्वानांचा तसेच त्यांना प्रशिक्षण देवून हाताळणारे पोलीस अंमलदार पो.ह. सिध्दलींग स्वामी, पो.ह चिदानंद रायकोटी, पो.कों राजू इंगळे यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे.
५) उत्कृष्ट गुन्हे तपास सोलापूर ग्रामीण घटकामध्ये मागील काही दिवसामध्ये गुन्ह्यांचा उत्कृष्ट व कुशलतेने तपास करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा देखील सत्कार या गुन्हे सभेमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये पो.नि. सुरेश निंबाळकर, स्था.गु.शा. पो.नि नारायण पवार, टेंभूर्णी पो.स्टे, पो.नि बालाजी कुकडे, बार्शी शहर सपोनि चौधरी, अकलूज पो.स्टे यांचा व त्याच्या पथकातील ३२ अंमलदार यांचा देखील प्रशांसापत्र देवून सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पदक, पुरस्कार व प्रशंसापत्र प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतूक केले. तसेच यापुढे “प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य हे प्रामाणिक व चोखपणे बजावून पोलीस खात्यास शोभणीय काम करावे. करण्यात आलेल्या कामाचे बक्षीस, पदक चे प्रस्ताव सादर करावेत व अधिक अधिक बक्षीस व पदके प्राप्त करावीत. जेणेकरून त्यांचे हे काम इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना स्फूर्तीदायक होईल असे मनोगत व्यक्त केले आहे.
यावेळी मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र, कोल्हापूर यांचसह मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री. प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!