Sangola
दबंग पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची कोळा येथे भेट; ग्रामस्थांशी साधला संवाद.


सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गुरुवार दि. ८ मे रोजी पोलीस फौज फाट्यासह कोळा येथे भेट दिली. या भेटी प्रसंगी कोळा दूरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी व अंमलदार यांच्याकडून कामकाजाची, कोळा भागातील गावांची व बाजारपेठ ची माहिती घेतली तसेच लवकरच होऊ घातलेल्या कोळा येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती घेऊन आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला जनतेने सहकार्य करावे असे आवाहन करून कोळा येथील ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा केली.
ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन आगामी काळात तालुक्याभरामध्ये पोलीस प्रशासन व जनता यांच्यामधील संवाद वाढवून लोकाभिमुख पोलीसिंग वर भर दिला जाईल व गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे प्रतिपादन यावेळी घुगे यांनी केले.
यावेळी कोळे ग्रामस्थांकडून नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी कोळे बीट चे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, संभाजीतात्या आलदर, ॲड.सचिन देशमुख, संतोष करांडे, हरी सरगर,बिरा आलदर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.