अरे व्वा…देर आये लेकीन, दुरुस्त आये ; वर्षाअखेरीस सांगोला पोलिसांची दमदार कारवाई..!
तब्बल ३६ लाख २५ हजार रुपये किमतीचे १४५ मोबाईल केले हस्तगत.
सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला पोलीस ठाणे हददीमध्ये दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत सांगोला पोलीस ठाणे हद्दीमधील गहाळ झालेले एकुण १४५ मोबाईल एकुण अंदाजे किमंत ३६ लाख २५ हजार रू.चा तांत्रीक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या हस्ते परत करण्यात आले आहेत. या वर्षभरामध्ये मोबाईल चोरी व गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी दाखल होत्या या तक्रारींपैकी वर्षाच्या अखेरीस का होईना मोबाईल परत मिळाल्याने देर आये लेकीन दुरुस्त आये अशा प्रकारचे समाधान व्यक्त होत आहे
२०२४ या वर्षभराच्या कालावधीमध्ये सांगोला पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गहाळ झालेल्या एकुण २५ मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकुण १६ मोबाईल अंदाजे किंमत ३ लाख २० हजार रू यांचा शोध घेवुन तक्रारदारस परत केले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदशना खाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांचे मार्गदशानाने पो.कॉ. शहाजहान शेख सांगोला पोलीस व पो.कॉ.रतन जाधव (सायबर पोलीस ठाणे) यांनी केल आहे. व तक्रारदार यांना विना त्यांचे मोबाईल विलंब परत केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या पुढे ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी पोलीस ठाणे येथे मोबाईलचे बिल आधारकार्ड व लेखी अर्ज असे संपूर्ण कागद पत्रासह रितसर तकार नोंदवावी असे अवाहन सांगोला पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी यावेळी केले आहे.