crime
तू…आमच्या म्हशीच्या पाठीमागून म्हैस का ओढत नेत आहे ? असे म्हणत एकाला मारहाण.
खिश्यातील २ लाख ५ हजार घेतले काढून;सांगोला येथील जनावराच्या बाजारातील घटना.
सांगोला/ तालुका प्रतिनिधी
जनावराच्या बाजारामध्ये म्हशीच्या पाठीमागून म्हैस ओढत नेल्याच्या कारणावरून दोघांनी एकास लोखंडी कोयत्याने, हाताने मारहाण करत खिशातील २ लाख ५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना रविवारी (ता. २२) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सांगोला बाजारात घडली आहे.
फिर्यादी आलम उस्मान पठाण (रा. राजवडी, ता. इंदापूर, जि. पुणे) हे जनावराचा व्यापार करीत असतात. ते प्रत्येक रविवारी सांगोला येथील जनावरांच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. त्यांच्या ओळखीचे सोन्या भोसले व दीपक भोसले हे ही जनावरांच्या खरेदी विक्रीचा करिता सांगोला येथे बाजारात येतात. रविवारी (ता. २२) रोजी सकाळी साडे दहा च्या सुमारास फिर्यादी आलम पठाण बाजारामध्ये विक्री आणलेली म्हैस बाजारातून घेऊन जात असताना त्या ठिकाणी सोन्या भोसले व दीपक भोसले हे फिर्यादीच्या जवळ आले व त्यांनी ‘तू आमच्या म्हशीच्या पाठीमागून म्हैस का ओढत नेत आहे ?’ असे विचारत शिवीगाळी करू लागले. त्यावेळी फिर्यादीने म्हैस बाजूला करतो असे सांगूनही त्यांनी हातातील लोखंडाच्या कोयत्याने फिर्यादीच्या कपाळावर मारले. सोन्या भोसले यांनी फिर्यादीच्या पॅंटीच्या खिशातील असलेले २ लाख ५ हजार रुपये काढून घेतले व जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. यावेळी फिर्यादीचा भाऊ सिकंदर व इतरांनी जखमी झालेल्या आलम पठाण यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. सोन्या भोसले व दीपक भोसले (दोघे रा. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध फिर्यादी पठाण यांनी सांगोला पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.