प्रहारचे सांगोला तहसील कार्यालया समोर आंदोलन सुरू..!
आमदार स्थानिक विकास निधी खर्च करण्याची मागणी.

सांगोला/ प्रतिनिधी
सांगोला विधानसभा लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी तात्काळ शासन निर्णया नुसार ‘आमदार स्थानिक विकास कार्यक्रम’ अंतर्गत निधी खर्च करावा, या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना, सांगोला तालुका यांच्या वतीने आज तहसील कार्यालयात समोर धरणे आंदोलन सुरू असल्यासाची माहिती प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुका अध्यक्ष सतीश दिडवाघ यांनी दिली आहे.
दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी प्रति वर्षी ३० लाख रुपये निधी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत खर्च करण्याची तरतूद असूनही सांगोला विधानसभा लोकप्रतिनिधी यांनी गेल्या पाच वर्षात निधी खर्च केला नसल्याने प्रहार आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर आंदोलनास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित असून प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष नविद पठाण, तयव बागवान , दादा खडतरे याच्या सह पदाधिकारी उपस्थित आहेत.
दिव्यांग बांधवांच्या मागण्यासाठी पाठिंबा म्हणून आर.पी.आय. तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, किशोर बनसोडे, युवक नेते महादेव कांबळे, विनोद रणदिवे ,जगनाथ साठे, आदींनी उपस्थिती दर्शीवली.
यावेळी बोलताना खंडू सातपुते सांगितले की, दिव्यांग बांधवांचा निधी खर्च न केलेल्या सांगोला लोकप्रतिनिधी यांचा आम्ही निषेध करतो,तरी तात्काळ सदर निधी खर्च करावा असे शेवटी सांगितले.