crime

धक्कादायक घटना..! हातीद येथे बापाने केला मुलाचा खून;पोलिसांनी तात्काळ ठोकल्या आरोपी ला बेड्या.

सांगोला / तालुका प्रतिनिधी

मौजे हातीद ता. सांगोला येथील बिरा बंडगर यांचे शिंपी वस्ती शाळेचे पाठीमागे हातीद गावचे हद्दीत असलेल्या सामाईक जमीन गट नंबर २७७ मध्ये काटेरी झाडे झुडपे तोडून त्याचा कोळसा तयार करण्यासाठी राहणेस आलेले कोळसेवाले १) रामा किसन पवार (आरोपी),२) गौरी रामा पवार (आरोपीची पत्नी),३) रोहीदास रामा पवार (गुन्ह्यातील मयत आरोपीचा मुलगा ), सर्व मुळ रा. कुसुबळे आदिवासी वाडी, निजामपुर, ता. माणगांव, जि. रायगड असे कुटूंबासह राहणेस होते.
    दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास गुन्ह्यातील मयत रोहीदास पवार हा त्याची आई गौरी पवार हीस शिवीगाळ व हाताने मारहाण करीत असताना यातील आरोपी वडील रामा किसन पवार हे सोडविणेस गेले असता त्यास मयताने ढकलुन दिल्याचा राग येवुन आरोपीने त्याचा मुलगा रोहीदास रामा पवार वय-१८ वर्षे याचे डोकीत कु-हाडीचे घाव घालुन त्याचा खुन केला असल्याची घटना घडली आहे.
सदर घटनेची फिर्याद बिरा बबन बंडगर रा.हतीद ता.सांगोला यांनी फिर्याद दिली असून सदर गुन्ह्यातील आरोपी रामा किसन पवार रा. कुसुबळे आदिवासी वाडी, निजामपुर, ता. माणगांव, जि. रायगड याना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सदर गुन्ह्यात पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उप-विभाग पंढरपुर, पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे सांगोला पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुजारी हे करीत असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!