पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या टीमची उल्लेखनीय कामगिरी.!
अपहरणाचा बनाव करून निघृण हत्या करणा-या आरोपीचा पर्दाफाश करण्यात मोहोळ पोलीसांना यश.!
मोहोळ /प्रतिनिधी
मोहोळ पोलीस ठाणे येथे दि.१५ डिसें.२४ रोजी इसम नामे कृष्णा नारायण चामे (वय ५२ वर्षे सध्या रा. यल्लमवाडी ता. मोहोळ) हे मिसींग झाले बाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे मिसींग दाखल झाली होती सदर मिसींगच्या ०३ दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसींग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला तसेच मिसींग व्यक्तीची सर्व जिल्हयातील तसेच आसपासच्या जिल्हयातील पोलीस ठाणेस तपास यादी पाठवून मिसींग व्यक्तीचे मोबाईलचा सीडीआर काढुन त्याचे अवलोकन केले परंतु सदर मिसींग व्यक्ती बाबत काही एक माहीती मिळून आली नाही.
सदर मिसींग मध्ये दि. १७ डिसेंबर २४ रोजी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन नमूद मिसींग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सदरच्या अपहरणाचे तपासात अपहरण झालेल्या व्यक्तीचे शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी यांचे कडुन माहीती मिळाली की, सदर अपहरण झालेल्या इसमास एका अज्ञात व्यक्तीने मोटार सायकलीवर घेवून गेल्याची माहीती मिळाली.
सदर प्रकरणातील कृष्णा चामे यांचे घर हे शेतामध्ये फॉरेस्ट ला लागुन आहे. सदर घराच्या आसपास साधारणता ०५ ते ०६ किलो मिटर अंतरापर्यंत शेती व फॉरेस्टची जमीन आहे. त्यामुळे सदर ठिकाणी राहती लोकवस्ती अगर सीसीटीव्ही सारखी तांत्रीक मदत मिळत नव्हती. तरी देखील घटनेच्या ०५ ते ०६ कि.मि.क्षेत्राचे बाहेरील रोडवर जावुन सीसीटीव्ही चेक करण्यात आलेली होती. पंरतु उपयुक्त माहीती मिळत नव्हती. अपहृत व्यक्ती कृष्णा चामे यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आलेला होता. त्याचा सीडीआर काढुन सर्व संशयीत व्यक्तीचा अभ्यास केला असता गुन्हयाचे तपास उपयुक्त माहीती मिळुन येत नव्हती.
अपहृत इसम नामे कृष्णा चामे व त्याचे कुटूंबीयांचे बॅक स्टेटमेंन्ट व इतर लोकांसोबत आर्थिक व्यवहार चा अभ्यास केला असता आसपासच्या १० ते १२ गावात आर्थिक व्यवहार असल्याचे दिसुन आल्याने त्या सर्व लोकांकडे सदर बाबत तपास केला परंतु त्यातुन ही गुन्हयाचे तपासयुक्त काही एक मिळून आले नाही.
कृष्णा चामे यांचा फोटो प्रसारमाध्यमाव्दारे प्रसारीत करून आसपासच्या सर्व गर्दीच्या ठिकाणी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, हॉटेल, या ठिकाणी अपहृत व्यक्तीचे फोटो प्रसिध्द केले. तसेच घटनेच्या ठिकाणचे आसपासचे सर्व नदी, नाले, विहीरी, कॅनाल व फॉरेस्ट असे आसपासचे सर्व ठिकाणी शोध घेतला असता अपहृत व्यक्ती मिळून आला नाही.
अशा प्रकारे सलग पाच दिवस अपहरण व्यक्तीचा तपास करून देखील काहीही भरीव माहीती मिळाली नाही. मात्र अपहरण व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणुन राहणारा सचिन भागवत गिरी (वय २५ वर्षे ता. सांगवी जि. धाराशिव) यांचे चौकशीत विसंगती समोर येत होती. तेंव्हा सचिन गिरी यास संशयीत म्हणुन ताब्यात घेवून त्याचे कडे गुन्हयाचे अनुशंगाने सखोल चौकशी केली असता, सदरचा गुन्हा हा त्यांने स्वतः केल्याची कबुली दिली सदरचा गुन्हा हा त्याने आर्थिक कारणाने व सोन्याचे लोभासाठी केल्याचे सांगितले आहे. तसेच सदर कृष्णा चामे यास त्यांने डोक्यात वारंवार हातोडा मारून प्रथम ठार मारले. व त्यानंतर त्यांने धारधार हत्यारांने त्याचे शरीरांचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळया कॅरीबॅग मध्ये भरून मयताचे शौचालयाच्या शोष खड्डयात पुरून ठेवले होते.
तसेच मयताचे अंगावरील सुमारे १८ ते १९ तोळे सोने, लॉकेट, अंगठया व सोन्याचे कडे असे त्यांने मयताचे घरासमोरील खड्डयात पुरले असल्याचे सांगितले. तसेच सदरची हत्या त्यांने एकट्यानेच केली असल्याचे सध्या तो सांगत आहे. तरी पंरतु गुन्हयाचे तपासात अधिक तपास करून आणखीन सह आरोपी आहेत अगर कसे याबाबत तपास करीत आहे. सदर आरोपी नामे सचिन भागवत गिरी (वय २५ वर्षे रा. सांगवी जि. धाराशिव) यास गुन्हयाचे तपासात अटक करून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक श्री. रणजीत माने मोहोळ पोलीस ठाणे हे करीत आहेत.