चक्क…आर.टी.ओ च्या वाहनाचे सांगोला येथे अपघात.

सांगोला /तालुका प्रतिनिधी
दि १०/११/२०२४ रोजी दुपारी ०२:३० वाजण्याच्या सुमारास सांगोला – पंढरपुर रोड वर सांगोला मार्केट यार्ड समोर सांगोला येथे अपघाताची घटना घडली आहे
स्कार्पिओ क्र. एम .एच.०४ एल.टी.६६४५ पंढरपूर ते सांगोला च्या दिशने जात असताना पंढरपुर ब्रिज च्या पुढे मार्केट यार्डचे गेटचे अलीकडे समोरील पिकअप जीप एम. एच. ये.एफ .२३४५ हे त्याचे वाहनाचे समोर अचानक पणे मार्केट यार्डच्या गेट मधून वाहन आल्याने पिकअप वाहनावरील चालकाने त्याचे ताब्यातील पिकअपचा ब्रेक दाबल्याने अकलूज आर.टी.ओ. ची स्कार्पिओ ही पिकअप वाहनास पाठीमागुन जाऊन धडकली असुन सदर अपघातात पिकअप वाहनाचे पाठीमागील बंम्पर बेंड झाला असुन आर.टी. ओ च्या स्कार्पिओ गाडीचे रेडीएटर, बोनेट, साईट पॅनेलची मोडतोड होऊन नुकसान झाले असल्याची खबर आर.टी. ओ. वाहन चालक राजेंद्र रामा जाधव (वय-३२ वर्षे,-व्यवसाय नोकरी) ), रा. पिंपळनेर ता. माढा जि. सोलापुर सध्या रा. टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापुर यांनी सांगोला पोलीस स्टेशन ला या अपघाताची खबर दिली असून पो.हे.कॉ व्हरे हे तपास करीत असल्याची माहिती सांगोला पोलिस ठाण्याकडून मिळाली आहे.