शेती विषयक

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओलावा पाहुन व बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी:- तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे

सांगोला / तालुका प्रतिनिधी

सांगोला तालुक्यामध्ये रब्बी पिकाच्या पेरणीचे ५७ हजार१५० हेक्टर क्षेत्रावर नियोजन. जमिनीमध्ये ओलावा पाहुन व बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन सांगोला तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

सांगोला तालुक्याचे सरासरी रब्बी पेरणी क्षेत्र ४४ हजार ४७१ हेक्टर आहे. यामध्ये रब्बी ज्वारी 37479 हे , मका 5156 हे , गहू ८२२ हे , हरभरा ७६८ हे  या प्रमुख पिकांची पेरणी केली जाते. गतवर्षी  रब्बी हंगामामध्ये ४२ हजार १२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पेरणी कमी झाली होती.  यावर्षी रब्बी हंगामामध्ये ५७ हजार १५० हेक्टर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारी ३६ हजार हे , मका १५ हजार हे, गहू ३हजार हे , हरभरा ३ हजार हे , करडई  १०० हे , सुर्यफुल  ५० हे पेरणी चे नियोजन केले आहे.

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान  ४६८.३ मिमी असुन आजरोजीपर्यंत ४९३.८  मिमी म्हणजे १०५ % पर्जन्यमान झाले आहे. यावर्षी एकंदरित पर्जन्यमान चांगले झाले आहे. शेतकरी बांधवांनी चांगला पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा पाहुन बिजप्रक्रिया करूनच रब्बी पिकांची पेरणी करावी. कृषि विभागा मार्फत रब्बी ज्वारी पिकाचे १ हजार हे क्षेत्रावर प्रात्यक्षिक प्रकल्प राबविले जात आहेत. त्याचबरोबर अनुदानावरती ज्वारीचे प्रमाणित बियाणेही वाटप केले जात आहे. खरेदी विक्री संघ व शेतकी भवन सांगोला येथुन परमिट वर किंवा ७/१२ व आधारकार्ड देऊन अनुदानावरती ज्वारी बियाणे उपलब्ध आहे.

रब्बी ज्वारीसाठी पेरणीपुर्वी प्रती किलो  बियाणास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) व थायमिथाक्झाम ३ ग्रॅम याप्रमाणे रासायनिक बिजप्रक्रिया करावी.  त्याचबरोबर २५ ग्रॅम अझोटोबक्टर व पि.एस.बी कल्चर प्रती किलो बियाणे याप्रमाणे जैविक बिजप्रक्रिया करावी.

पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा.

रब्बी ज्वारी पेरणीसाठी फुले रेवती , फुले सुचित्रा , मालदांडी ३५-१ , फुले वसुधा, परभणी मोती , परभणी ज्योती  , परभणी क्रांती या सुधारित वाणांचा वापर करावा. बाजारामध्ये बियाणे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. शेतकर्‍यांनी आधिकृत दुकाणदाराकडुनच बियाणे ,  खते व किटकनाशके खरेदी करावेत. दुकान दाराकडुन पक्के बिल घ्यावे. बॅग व लेबल जपुन ठेवावे.बॅग वरिल किंमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये.

अधिक माहितीसाठी कृषि विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!