सांगोला तालुक्यात डी.वाय.एस.पी पथकाच्या धडक कारवाया;सांगोला पोलीस अनभिज्ञ आहेत का .?
सांगोला शहर व तालुक्यात जुगार,मटका ओपन..!
सांगोला / तालुका प्रतिनिधी
सध्या सांगोला तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक, अवैध गुटखा विक्री, गावोगावी सुरू असणारी बेकायदेशीर दारू साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने फोफावत असलेला खाजगी सावकारी व्यवसाय यासह गल्लीबोळात घेतला जाणारा कल्याण- मुंबई मटका सध्या तालुका वासियांसाठी गंभीर समस्या बनत चालला आहे शहर व तालुक्यातील गल्लीबोळात असणाऱ्या पान टपऱ्या जणू मटका घेण्याचे केंद्रच बनले आहेत याकडे पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याने तालुक्यात राजरोस सुरू असणारा कल्याण- मुंबई ओपन मटका क्लोज कधी होणार ? असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
मटक्याच्या आकड्यावर नशीब आजमावून झटपट श्रीमंत होण्याच्या स्वप्नातून अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त झाले आहेत पूर्वी लपून छपून चालणारा कल्याण- मुंबई मटका आता मात्र खुलेआम सुरू आहे शहर व तालुक्यात गल्लीबोळात असणाऱ्या पान टपऱ्या फक्त नावालाच पानशॉप आहेत वास्तविक पाहता त्यामध्ये असणारे युवक एक छोटा कागद व पेन घेऊन कागदावर मटका घेत बसलेले आढळतात कल्याण-मुंबई मटक्याच्या नादात सांगोला तालुक्यातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत कित्येक जण या नादापाई अक्षरशः देशोधडीला लागले आहेत तरीही आज ना उद्या आपला फिगर उडणार या आशेवर आजही अनेक जण कल्याण मुंबईकडे आस लावून बसले आहेत त्यांच्या याच आशेतून स्वतःची संधी शोधून मटका एजंट व बुकी मालक दिवसेंदिवस मालामाल होत चालले आहेत मटक्याच्या आकड्यावर पैसे लावणारे कित्येक जण कर्जबाजारी होऊन गाव सोडून गेले.
उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा यांचे पथक मटका आणि जुगारावर कारवाई करताना दिसून येत आहेत तरीही कारवाई पासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवून सध्या आकडा लावणारे मोबाईल वरूनच मेसेज करून आपला आकडा आणि रक्कम एजंटला कळवत आहेत तर एका कागदाच्या चिठ्ठीवर एकत्रितपणे लावलेले आकडे लिहून त्याचा फोटो एजंट करून बुकी मालकांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून अलगदपणे पोहोचवत आहेत या सगळ्या प्रक्रियेत या कानाची त्या कानाला खबर होणार नाही याची एजंट खबरदारी घेतात.
कल्याण- मुंबईच्या आकड्यावर पैसे लावून आपल्या आयुष्याचा जुगार खेळणाऱ्या अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे तरीही सांगोला शहर व तालुक्यात राजरोसपणे सुरू असणारा कल्याण मुंबई चा ओपन असलेला मटका व जुगार क्लोज कधी होणार.? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा यांच्या पथकाने नुकतेच सांगोला शहर व तालुक्यात जुगार, मटका या अवैध धंद्यांवर धडक कारवाईचा बडगा उगारून कारवाया केल्या मात्र स्थानिक पोलिसांना या अवैधंद्यांबाबत अनुभिज्ञ आहेत का ? की त्यांच्या “कृपादृष्टीने”च हे अवैध धंदे फोफावत आहेत की काय ? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.