Sangola

दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार :- आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांची बैठक संपन्न.

सांगोला / तालुका  प्रतिनिधी

बुधवार दि .२ ऑक्टोबर रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले होते. सदर आंदोलनाची दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी काल गुरुवार दि.३ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय सांगोला येथे तहसील कार्यालय , सांगोला नगरपरिषद , पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन यांचे प्रमुख अधिकारी व दिव्यांग बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती.
यावेळी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राध्यान्य द्यावे अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या.तसेच दिव्यांग भवनाचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लागणारा निधी अजिबात कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सर्वप्रथम प्रहार दिव्यांग क्रांतीचे ता.अध्यक्ष सतीश दिडवाघ यांनी दिव्यांग बांधवांना स्वतंत्र शिधापत्रिका, ग्रामपंचायतींनी ५ % निधी खर्च करावा आणि इतर समस्या सांगितल्या. त्यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिव्यांग बांधवांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास त्या प्राधान्याने सोडवाव्यात अशा सूचना दिल्या
सदर बैठकीस तहसीलदार संतोष कणसे, निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, मुख्याधिकारी सुधीर गवळी, गटविकास अधिकारी श्री. कुलकर्णी, पंचायत समिती अधिकारी श्री. फुले, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नविद पठाण, दादा खडतरे, बापू इंगोले, यांच्यासह शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख ,उद्योगपती आनंद घोंगडे,मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष दीपक ऐवळे, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे ,संतोष खडतरे या प्रमुखांसह दिव्यांग बांधव तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित होते . उपस्थितीत दिव्यांग बांधवांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात येणार असल्याने दिव्यांग बांधवाकडून शहाजीबापू पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!