सांगोला शहरातील आठवडा बाजार शेजारी दुकानगाळे बांधकामासाठी २ कोटी ८७ लाख ९८ हजार रुपये निधी मंजूर :आमदार शहाजीबापू पाटील.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सांगोला शहरातील नगरपालिका क्षेत्रात आठवडा बाजार शेजारी ३६ दुकान गाळे ( तळमजला व पहिला मजला ) बांधकामासाठी २ कोटी ८७ लाख ९८ हजार ९९४ रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी या दुकान, गाळ्याच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी व पाठपुरावा केला होता. या निधीच्या माध्यमातून हे दुकान गाळे तयार होणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी याचा निश्चितपणे फायदा होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
सांगोला नगरपालिका क्षेत्रातील आठवडा बाजार शेजारी ३६ दुकान गाळे तळमजला व पहिला मजला बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच हे काम सुरू होईल . गाळ्याचे काम पूर्ण होताच सुशिक्षीत बेरोजगार व व्यापारी वर्गाला याचा उपयोग होणार आहे.