एस.पी.साहेब.. जरा इकडे लक्ष घालाच..!
सांगोल्यात अवैध धंदे राजरोस पणे सुरू; गुन्हेगारी बोकाळली;अनेक गुन्ह्यांचे तपास रखडले.!

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला शहर व तालुक्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून विविध ठिकाणी चोऱ्या व घरफोड्या च्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे गेल्या काही दिवसांपासून चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये चोरट्याने रोख रक्कम यासह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लंपास करण्याच्या घटना घडल्या आहेत.
सांगोला तालुक्यामध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांपैकी चोरट्यांना जेरबंद करण्यात अपवाद वगळता सांगोला पोलिसांना सपशेल अपयश आल्याचे दिसून येत आहे.
सांगोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सांगोला तालुक्यामध्ये एखादा दिवस वगळता कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालून चोरट्यांना जेरबंद केल्यास सर्वसामान्यांना आपले दैनंदिन जीवन निर्भय वातावरणात जगता येईल हे नक्की.
तालुक्यात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व चोरीच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांचा ताफा रात्रभर गस्तीसाठी फिरत असतो मात्र रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना गुंगारा देत चोर आपले चोऱ्या करण्याचे काम अगदी चोखपणे पार पाडत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
डी वाय एस पी पथकाची कामगिरी कौतुकास्पद.!
सांगोला तालुक्यात अवैध धंदे बोकाळले आहेत जुगार, मटका, गुटखा, ऑनलाइन जुगार राजरोसपणे सुरू आहेत याकडे सांगोला पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून डीवायएसपी मंगळवेढा यांचे पथक धडक कारवाया करत आहेत सांगोला पोलिसांना हे अवैध धंदे दिसत नाहीत का ? की त्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व अवैध धंदे उघड उघड सुरू तरी नसावेत ना ?असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
—————————————————————————————————————————————————-
डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेन्शन..!
डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेन्शन,
हे गुन्हेगारी रोखण्याचे तत्व आहे पण यामध्ये सांगोला पोलीस कमी पडत असल्याचे दिसत आहेत चोऱ्या, घरफोड्या यासह गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे तपास लावून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अपवाद वगळता पोलिसांना यश आल्याचे अद्याप तरी दिसून येत नाही त्यामुळे सांगोला पोलिसांच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी व्यक्त होत आहे.