ट्रॅक्टरने ठोसा देऊन विजेचे खांब तोडले; सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
ट्रॅक्टर हायगईने, अविचाराने चालवुन महाराष्ट्र विज वितरण कंपनीच्या मालकीचे वीजेचे दोन पोल पाडुन व तारा तोडुन सुमारे ३० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची घटना दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजणेचे सुमारास सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावातील खरात वस्ती येथे घडली.घटनेची फिर्याद अजय रंगनाथ गेजगे (रा. चिकमहुद) यांनी दिली असून धनाजी सुखदेव खरात (रा. सोनलवाडी ता.सांगोला) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चिकमहुद गावातील खरात वस्ती येथील कॅनल जवळ धनाजी खरात (रा. सोनलवाडी ता. सांगोला) यांने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगईने, अविचाराने चालवुन महाराष्ट्र विज वितरण कंपनीच्या मालकीचे वीजेचे दोन पोल पाडुन व तारा तोडुन सुमारे ३० हजार रुपयाचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नोंद करण्यात आले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पो.ना. बनसोडे हे करीत आहेत.