Sangola
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे तथा तहसीलदार सांगोला यांचे उपस्थित पत्रकार सभा संपन्न.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
दिनांक ०९/११/२४ रोजी सायंकाळी पाच वाजता संतोष कणसे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उपस्थित पत्रकाराची सभा आयोजित केली होती यावेळी पत्रकारांसमोर २५३ विधानसभेची निवडणूक संदर्भात तयारी होत आल्याचे संतोष कणसे यांनी सांगितले असुन आपले कडे एकूण ३लाख ३३ हजार ४९३ मतदार असून १ लाख ७२ हजार ७०४ पुरूष मतदार १ लाख ६० हजार ७८४ स्त्री मतदार व ५ ईतर मतदार असून या साठी ३०९ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तसेच घरीबसुन मतदान करणारे ८५ वय वर्ष असणारे ६५९ लोकांनीच १२ डी फॉर्म भरून दिला असून ७१ दिव्यांग बांधव यानी होम ओटींग साठी फॉर्म भरला आहे व कांहीनी मतदार केंद्रावर मतदान करणार असल्याचे सांगीतले आहे होम ओटींग चा कार्यक्रम दिनांक १३/११/२४ ते १६/११/२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून त्या साठी १३ रूट तयार केले आहेत सैनिक मतदार ८८६ असून टपाली मतदार ३ हजार आहेत ह्यांचे मतदार तीन दिवस अगोदर पुर्ण करण्यात येईल अशी माहिती संतोष कणसे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्याचे मिडीया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिल्याचे सांगण्यात आली आहे.