Sangola
सांगोला पोलीस प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे:- पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे.
सशस्त्र पथसंचलन करून मतदारांना दिली सुरक्षिततेची हमी.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला शहर व तालुक्यात कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसावा तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मतदान करून निर्भयपणे लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, यासाठी सांगोला पोलीस सज्ज झाले आहे.
सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. २८ रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचालन करण्यात आले.
या सशस्त्र पथसंंचालनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीना पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी पुनश्च एकदा सावधान..! “कायदा हातात घ्याल तर खैर नाही” असा गर्भित इशारा दिला असून मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निर्भय वातावरणाने मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे.