चिंचोली येथील कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हातात घेतल्यापासून
विधानसभा निवडणुकीत दिपकआबा साळुंखे पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचे या ईर्षेने पेटलेल्या कार्यकर्त्यांसह एकदिलाने शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे.
दरम्यान माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी ठाकरे गटाची मशाल हाती घेतल्यापासून त्यांच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. आबांनी मशाल घेतल्यापासून शिवसेनेत दररोज इनकमिंग सुरू आहे. तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत आहेत.
चिंचोली ता. सांगोला येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप शिनगारे, रामेश्वर शिनगारे, शहाजी खरात, महादेव शिनगारे, समाधान शिनगारे, दिलीप शिनगारे, हरिदास शिनगारे, यश शिनगारे, नागनाथ शिनगारे, औदुंबर शिनगारे, विष्णू शिनगारे, प्रकाश शिनगारे, सिद्धेश्वर इंगोले, यश शिनगारे, गणेश शिनगारे, ज्ञानेश्वर शिनगारे, बापू शिनगारे, समाधान शिनगारे (दादा) भैया गेजगे, दत्तू गडदे, श्रावण घाडगे, ऍड.दत्तात्रय घाडगे, बाळू पाटील, अनिल कदम, दत्ता टकले, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश सुर्यागन, लक्ष्मण तात्या घाडगे, सुशील भोसले, अभिजीत सूर्यागन, अश्वजीत सूर्यागन, राजकुमार सूर्यागण, अजित सूर्यागण, कुमार सूर्यागण, राम घाडगे, संजय घाडगे, नवनाथ घाडगे, विजय घाडगे, सदाशिव कांबळे, सोमनाथ पवळ, दत्ता घाडगे, नितीन घाडगे, आप्पा भोसले, तात्या भोसले, सुरेश खंडागळे, मल्हारी मनमे, विशाल गोरे, कुमार भोसले, शिवाजी भोसले यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत हातात मशाल घेतली आहे.
यावेळी तानाजीकाका पाटील, शिवाजीनाना बनकर, अशोक शिनगारे, गिरीश पाटील, शाहूराजे मेटकरी, जोतीराम जगताप, सोमनाथ गोरे, भाग्यवंत पवळ, राजू जगताप, विठ्ठल बेहरे आदी उपस्थित होते.
चिंचोली गावात आणि सांगोला तालुक्यात यापुढे अजिबात दबावाचे राजकारण चालू देणार नाही. शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. मी कार्यकर्ता जपणारा माणूस आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे तिरक्या नजरेने बघायची कुणाची हिंमत होणार नाही असा विश्वास दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.