पोलिस निरीक्षक. भिमराव खणदाळे यांच्या उत्तम नियोजनामुळे कायदा व सुव्यवस्था राहिली अबाधित.
सांगोला तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्तामुळे शांततेत मतमोजणी.
सांगोला / प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी तालुक्यातील मतमोजणी साठी पोलीस बंदोबस्ताचे उत्तम नियोजन केले होते. त्याचाच परिपाक म्हणून मतमोजणी शांततेत, उत्साहात व कोणतेही गालबोट न लागता पार पडली.
सांगोला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सांगोला शहरातील पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर सभागृह ( टाऊन हॉल) येथे पार पडली या मतमोजणीच्या ठिकाणी तसेच शहर व तालुक्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. संपूर्ण राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात आली.
मतमोजणीमुळे शनिवारी सकाळी मतमोजणीच्या ठिकाणी जाणारे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. मतमोजणी करणारे अधिकारी, कर्मचारी,उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी प्रशासनाकडून पासेस देण्यात आले होते. हे पासेस असणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून मतमोजणी केंद्रात सोडण्यात आले. यावेळी पोलिसांकडून सर्वांची तपासणी करण्यात आली लोकांना मोबाइल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली होती.
मतदान केंद्र परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याचप्रमाणे मतमोजणीनंतर शहर व तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. तसेच पोलिसांकडून प्रमुख रस्त्यांवर गस्त घालण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिसांनी विविध पक्षांच्या कार्यालयासमोर देखील पोलिसांचा बंदोबस्त कडे कोट ठेवला होता.