Sangola

सांगोला / प्रतिनिधी
२५३ सांगोला विधानसभा साठी मतमोजणी दिनांक २३ /११/ २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे सदरची मतमोजणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून या मध्ये अधिकारी व कर्मचारी मिळुन सुमारे १०० जणांची टीम कार्यरत केली आहे
   निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी मतमोजणीसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱी यांना आदेश दिलेले आहेत
मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असून एकूण २३ फेऱ्या होणार असून त्यासाठी १४ टेबल ठेवण्यात आले असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी सांगितलेले आहे.
   मतमोजणी सुलभ होण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत संपूर्ण मतमोजणी साठी नियंत्रण अधिकारी, स्लिप मोजण्यासाठी अधिकारी, स्ट्रॉंग रूमसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे आणि ९ कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत सिलिंग टीम , नेमलेले आहेत ,भोजन व्यवस्था, हजेरी घेणे, स्क्रीन डिस्प्ले, व्हिडिओ चित्रीकरण, रिपोर्टिंग साठी ,आणि मीडिया साठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!