मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सांगोला तालुक्यातील मंगळवेढा- पारे -जत-बिल्लूर ते राज्य हद्द टप्पा क्र.३ या रस्त्याचा ऑनलाईन प्रणालीद्वारे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.
रस्ता भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त वाणिचिंचाळे येथे आमदार शहाजीबापू पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
आशियाई विकास बँक अर्थसाहाय्यीत प्रकल्पांतर्गत टप्पा क्रमांक ३ व केंद्र शासन साह्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मंगळवेढा पारे-जत बिल्लूर ते राज्य हद्द रस्ता या १५६ कि.मी च्या १७७ कोटी ६० लाख रुपये निधीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ऑनलाइन प्रणालीद्वारे शुक्रवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे येथे आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत ,सांगोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अशोक मुलगीर , शाखा अभियंता समाधान हिप्परकर यांच्यासह वाणीचिंचाळे व तालुक्यातील विविध पदाधिकारी, मान्यवर यांच्या उपस्थितीत रस्ते भूमिपूजन ऑनलाइन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मंगळवेढा पारे, जत, बिल्लूर ते राज्य हद्द रस्ता टप्पा क्रमांक ३ या, सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाल्याचे जाहीर केले. या रस्त्यालगत प्रवासी निवाराशेड, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करून ,उत्कृष्ट रस्ता तयार करण्याचे नियोजन आहे .
रस्ता पूर्ण झाल्यानंतर दळणवळणाची उत्तम प्रकारे सोय होईल .तसेच वेळेची व पैशाची बचत होईल. दर्जात्मक रस्त्यामुळे प्रवासही सुखकर होणार आहे . नजीकच्या काळात वाणिचिंचाळे परिसरातील प्रत्येक गावाला म्हैसाळ योजनेतून पाणी देण्याचे नियोजन आहे .येत्या वर्षभरात वाणिचिंचाळे गावात सुमारे १ हजार एकरावर ऊस लागवड झाल्याचे चित्र निर्माण करायचे आहे. वाणीचिंचाळे गावातील प्रत्येक एकर ओलीताखाली आणून शेतकरी वर्गासह सर्वांनाच सुखी व समृद्ध केले जाईल असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी वाणीचिंचाळे येथे केले.
यावेळी चेतनसिंह केदार -सावंत म्हणाले, महायुती सरकारने सांगोला तालुक्यातील मंगळवेढा, पारे, जत – बिलुर हा, १५६ किमी हद्द रस्ता मंजूर करून १७७ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर केला. आमदार शहाजीबापू पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी खूप मोठे प्रयत्न केले आहेत. जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील विविध रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला व अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली.
यावेळी कडलासचे सरपंच सुनील पवार, मा.सरपंच चिदानंद स्वामी ,मा.सरपंच लक्ष्मण निळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अशोक मुलगीर यांनी मनोगत व्यक्त केले. या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी डॉ.विजय बाबर, सरपंच संतोष पाटील, सरपंच जितेंद्र गडहिरे , सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर ,व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.