सांगोला तालुक्यात जुनोनी येथे चोरट्यांचा डाळिंबावर डल्ला.!

सांगोला / तालुका प्रतिनिधी
अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडतात कधी पैसै व दागिन्यांची चोरी होते तर कधी वस्तू पिकांच्याही चोरीच्या घटना समोर येतात
अशीच एक चोरीची घटना सांगोला तालुक्यातून समोर आली आहे.
अज्ञात चोरट्यांनी ३० ते ३५ किलो डाळींब चोरून नेले असल्याची घटना जुनोनी ता.सांगोला येथे घडली.
या चोरीची फिर्याद दत्तात्रय भिमराव माळी (व्यवसाय-शेती, रा.जुनोनी, ता.सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दत्तात्रय माळी यांची जुनोनी ता. सांगोला येथे शेती गट नं- ६४१/३ मध्ये ३३ गुंठे शेती आहे.
सदरचे क्षेत्रामध्ये डाळीबांचे पीक आहे.सदरचे डाळीबांचे पीक हे काढणीला आलेले आहे. दि. ०७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान शेतातून मिरज येथे फिर्यादी हे कामानिमीत गेले होते. जाणेपुर्वी शेतातील डाळींब हे सुस्थितीत होते.
दि.८ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजणेचे दरम्यान फिर्यादी शेतात गेले असता शेतातील १०ते १२ डाळींब झाडाचे डाळींब तोडून नेले असलेचे लक्षात आले. याबाबत फिर्यादी यांनी आजुबाजुला चौकशी केली असता त्याबाबत काही माहिती मिळुन आली नाही.
त्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात आल्याचे फिर्यादीत म्हटले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.