Sangola
सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे वीज पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.

सांगोला / प्रतिनिधी
वीज अंगावर पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे शनिवारी दुपारी मानेगाव परिसरात वादळी वारा व पाऊस झाला. दुपारी ३.३० वाजता सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे मानेगाव-डोंगरगाव रस्त्यावर चंद्रकांत बाबर यांच्या वस्ती च्या पाठीमागे वीज पडून दिनेश शंकर चव्हाण वय २५ हे तरुण मयत झाले. तर डोंगरगाव येथील माणिक अण्णा किरगत यांच्या शेतात विज पडून खिलार गाय मृत झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.