सांगोला विधानसभेसाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल; गुरुवार २४ नोव्हेंबर अखेर ८० अर्जाची विक्री.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
२५३ सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवार २४ नोव्हेंबर अखेर ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या पैकी एक अर्ज पक्षाकडून तर दोन अर्ज अपक्ष उमेदवारांनी दाखल केले आहेत.
काल गुरुवारी १८ अर्जाची विक्री झाली असून एकूण ५३ जणांनी ८० अर्ज घेतले आहेत. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाकडून राघू येताळा घुटुकडे तर उमेश ज्ञानु मंडले व परमेश्वर पांडुरंग गेजगे यांनी अपक्ष अर्ज भरल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यांनी दिली आहे.
सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी एक तर गुरुवारी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सांगोला विधानसभा मतदारसंघांतून न्यू राष्ट्रीय समाज पक्षाकडून राघू येताळा घुटुकडे, तर उमेश ज्ञानु मंडले व परमेश्वर पांडुरंग गेजगे यांनी अपक्ष अर्ज भरले असून दिवसभरात १८ उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार २९ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. गुरुवारी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, सचिन देशमुख, डॉ. पियूष साळुंखे पाटील, रासपचे सोमा मोटे, वंचित बहुजन आघाडीचे विनोद उबाळे, हरिश्चंद्र चौगुले, दिगंबर लवटे, हरिदास वाळके, गोविंद कोरे, साहेबराव पाटील, संजय पाटील, रणसिद देशमुख, मोहसीन खतीब, शरद उर्फ बंडू आगतराव गडहिरे यांनी अर्ज खरेदी केले असून एकूण ५३ जणांनी ८० अर्ज खरेदी केले आहेत.