ॲड. शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा ,तुमची इच्छा पूर्ण करू–मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगोला येथील आम. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारसभेसाठी न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक गर्दी
सांगोला / तालुका प्रतिनिधी–
२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून समोरच्याचे डिपॉझिट जप्त करा. विरोधक पुन्हा निवडणुकीची भाषा करणार नाहीत . सांगोलेकरांना फक्त बापूच हवे आहेत .आम. शहाजीबापू पाटील यांना तुम्ही प्रचंड मताधिक्याने विजयी करा. ॲड. शहाजीबापूंच्या प्रचार सभेसाठी न भूतो न भविष्यती गर्दी पाहून आमदार शहाजीबापूंचा या निवडणुकीत विजय निश्चित असून तुमची इच्छा पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला येथे दिले .
२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावरती आयोजित केलेल्या ऐतिहासिक प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार शहाजीबापू पाटील हे माझे सर्वात लाडके आमदार आहेत .बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात. २३ तारखेला शहाजीबापू पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. बापू फटाके व गुलाल पहिल्यापेक्षा जास्ती तयार ठेवा असे मुख्यमंत्र्यांनी आनंदाने सांगितले. सांगोल्याचा आवाज आम. शहाजीबापू पाटील यांच्या रूपाने विधानभवनात गाजणार आहे. शहाजीबापू पाटील तुम्ही विजयाची साखर वाटायला तयार व्हा .आम. शहाजीबापूं पाटील यांनी गुवाहाटी ,मुंबई जिंकले .तो डायलॉग जगभर पोहचला. बापूंनी मतदारसंघांमध्ये शेतकरीवर्ग व सर्वसामान्यांच्या कष्टाला न्याय देत प्रचंड विकास कामे केली. येथील शेतकरी प्रचंड प्रमाणात कष्ट करून डाळिंब बागा फुलवतो. बापूंनी गेल्या दोन वर्षात तालुक्याची परिस्थिती बदलली. तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. ५ हजार कोटी निधीतून तालुक्यातील अनेक विकास कामे पूर्ण करीत सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला. महाविकास आघाडी सरकार पेक्षा महायुती सरकारने तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी देऊन दानत दाखवली आहे .त्यासाठी मोठे मन लागते. विरोधकांना आता पाण्यातही बापू दिसतात .स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी उजनीचे २ टीएमसी पाणी मिळवले त्यासाठी ८८५ कोटी रुपये निधी मंजूर केला. दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमदार शहाजीबापू पाटील अशी त्यांची ओळख आहे. शहाजीबापूंनीच महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या वेळी मिशन पूर्ण केले. हे सरकार लाडक्या बहिणींना भविष्यात २१०० रुपये देणार .शेतकरी सन्मान योजनेसाठी १५ हजार रुपये करणार. वयोवृद्ध लाभार्थ्यांना २१०० रुपये देणार, २५ लाख रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे, पोलीस दलात २५ हजार महिला पोलिसांची भरती करणार ,शेतकऱ्यांचे साडेसात एचपीच्या आतील विज बिल माफ केले .घरगुती व इतर वापरातील लाईट बिलावर ३० टक्के सवलत देणार, २०२९ विजयी महाराष्ट्र म्हणून जाहीर करणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला येथे जाहीर सभेत स्पष्ट केले .
यावेळी शहाजीबापू पाटील म्हणाले, माझ्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या विजयी संकल्प सभेसाठी उपस्थित असलेल्या बंधू-भगिनींची गर्दी पाहून यासर्वांनी मते दिली तर माझा विषय आज निश्चित झाला हे जाहीर केले .माझी लढाई ही तालुक्यातील दुष्काळा विरोधात होती. तालुक्याला टेंभू, म्हैसाळ ,उजणी योजनेचे पाणी आणून तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला.८१ गावची शिरभावी पाणीपुरवठा योजना नव्याने मंजूर करून घेतली. त्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात येणार आहे. रोजगार हमीचा तालुका, ऊसतोड कामगारांचा तालुका आशी तालुक्याची ओळख संपुष्टात आणली .नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचा लोंढा थांबवून तालुक्यातच नोकरी देण्यासाठी मोठी एमआयडीसी आणून तरुणांना भवितव्य देणार . स्व.आमदार गणपतराव देशमुख यांच्याकडे ५५ वर्ष व दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे ६ वर्षे आमदारकी होती .त्यांनी या कालावधीत पाण्याची एकही योजना व विकासाचे काम केले नाही. त्यांनी आणलेला निधी व केलेले काम तपासा व मी आणलेला निधी व सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणलेला निधी तपासा. दीपक आबाचे जवळा गाव हे मी म्हैसाळ योजनेत समाविष्ट केले. मी आणलेल्या पाण्यावर ते भविष्यात ऊस पिकवतील . तालुक्यात राबवण्यात येणारी जलजीवन मिशन योजना २५० कोटीची असून निधी मंजूर आहे. प्रत्येक घराला पाणी देण्याचा संकल्प आहे. रस्ते, पाणी, वीज, समाजमंदिरे, धार्मिक स्थळे , यासारख्या कामासाठी खूप मोठा निधी खर्च केला. गुवाहाटीला जाऊन राजकीय क्रांती केली म्हणून महायुती सरकार सत्तेवर आले व तालुक्याला 5 हजार कोटीहून अधिक निधी मिळाला व तालुक्याची विकास कामे करता आली.
यावेळी चेतनसिंह केदार सावंत, मुबिना मुलाणी, प्राध्यापक संजय देशमुख, श्रीकांतदादा देशमुख, दादासाहेब लवटे, आनंदकाका घोंगडे, सुनीलनाना पवार , डॉ. विजय बाबर, विजय बनसोडे, खंडू सातपुते, संभाजीतात्या आलदर, विजयदादा शिंदे, ॲड. महादेव कांबळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर, आमदार प्रशांतराव परिचारक, शशिकांतभाऊ देशमुख, ॲड. उदयबापू घोंगडे, वृषालीताई पाटील, रेखाताई पाटील, राणीताई माने ,छायाताई मेटकरी, राजनंदिनी पाटील ,राणीताई पाटील,सागरदादा पाटील, दिग्विजयदादा पाटील, शिवाजीराव बाबर, शहाजीराव नलवडे, सुभाष इंगोले, नवनाथभाऊ पवार, शिवाजीअण्णा गायकवाड ,डॉ. मानस कमलापूरकर, दत्ता टापरे, एन .वाय. भोसले, जगदीश पाटील, ॲड. बंडू काशीद ,अण्णासाहेब जोल्हे. भारत चव्हाण, आनंदाभाऊ माने, अस्मिर तांबोळी, माऊली तेली, पोपटशेठ यादव, गुंडादादा खटकाळे, दुर्योधन हिप्परकर, बाळासाहेब आसबे, दीपक ऐवळे ,अमोल शिंदे, रविराज शिंदे, गोविंदअण्णा जरे, फिरोज खतीब ,सौदागर केदार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी होलार समाज, लोणारी समाज यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला . धनगर समाजाच्या वतीने माजी नगरसेवक व शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने व धनगर समाज बांधवांच्या हस्ते गजिढोल, घोंगडी, काठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी व विचारधारा ऐकण्यासाठी महिला, शेतकरी ,तरुणवर्ग मतदार बंधू-भगिनींची ऐतिहासिक गर्दी झालेली होती. यावेळी हरिभाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. सभास्थळ हे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींनी फुलून गेले.फटाक्यांच्या आतषबाजीत मुख्यमंत्र्यांचे मोठ्या जल्लोषात जल्लोष स्वागत करण्यात आले. आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून देऊन राज्यात महायुती सरकार आणण्यासाठी विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.