सावधान… कायदा हातात घ्याल तर खैर नाही:-पो.नि.भिमराव खणदाळे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार.

सांगोला / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.या सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी, एमपीडीए यासारखी कारवाई करण्यात येणार आहे सांगोला पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यातील सुमारे ५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, टोळीने गुन्हे केलेल्या २ टोळ्यावर (महाराष्ट्र पोलीस कलम ५५ प्रमाणे) २ वर्षांसाठी ४ जिल्ह्यातून तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात येत आहे तर १ जणांवर एमपीडीएची कारवाई (महाराष्ट्र पोलीस कलम कायदा ५६ प्रमाणे) ४ जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे.
तसेच सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार केली असून प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी व एमपीडीएची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होवून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्या दिवसापासून उमेदवारांना पुढे १८ नोव्हेंबरपर्यंत प्रचार करता येईल. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
या काळात पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष राहणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हा केल्यास पुढे त्यांच्यावर स्थानबद्धतेची किंवा तडीपारीची कारवाई होवू शकते.
त्यामुळे सर्वांनी शांतता पाळावी, लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी केले आहे.
निवडणूक काळात सामाजिक शांतता व ‘सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे नेहमीच लक्ष असते, पण निवडणूक काळात विशेष लक्ष राहणार आहे.