दबंग पोलिस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या टीमची धडाकेबाज कामगीरी.!
सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल चोरट्यांकडून केला जप्त.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणणेकरीता सांगोला पोलीस ठाणे कडील तपास पथक नेमुन पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे यांनी दिलेले सुचना प्रमाणे सांगोला पोलीस ठाणे कडील गु. र. नं. १९१/२०२५ बी एन एस कलम ३०३(२) मधील फिर्यादी नामे सुनिल शामराव गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला जि. सोलापूर) यांची मोटार सायकल माउली हॉटेल मिरज रोड सांगोला येथुन चोरी झाले बाबत अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल होता.
सदरच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणेकडील पथक चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत तपास करीता असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणारे इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नांव सुनिल मारुती मंडले (वय २६ वर्षे रा. पिंपरी खुर्द ता. आटपाडी सध्या रा. देवापूर ता. माण, जि. सातारा) याचे नावे निष्पन्न करुन त्याने मोटार सायकल चोरी केले बाबत कबुली देवून ती मोटार सायकल जप्त करुन आरोपीस गु. र. नं. १९१/२०२५ या गुन्हयात आरोपी सुनिल मंडले यास अटक करुन त्याचेकडे पोलीस चौकशी दरम्यान सांगोला पोलीस ठाणे कडील गु. र. नं. १२४/२०२५ बी एन एस कलम ३०४ (२) मधील फिर्यादी नामे सुनंदा लक्ष्मण गोडसे (रा. लक्ष्मी नगर, ता. सांगोला यांना आरोपीने त्यांचे जवळील चारचाकी गाडीत बसवून तिस लक्ष्मीनगर येथे सोडतो असे म्हणून तिस लक्ष्मीनगर रोडवरील नर्सरी जवळ सोडुन तिचे गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याचे गंठण व ७ ग्रॅम सोन्याचे बोरमाळ असे शुभांगी रामचंद्र बुधावले (वय २६ वर्षे रा. निंबवडे, ता. आटपाडी) हिने व आरोपी सुनिल मंडले यांनी हिसका मारुन ते चोरी केले बाबत सांगून सदरचे सोन्याचे दागिने काढुन दिले. त्याप्रमाणेच सांगोला शहरातील विनय कल्याण कांबळे (रा. वासुद रोड नरेंद्र नगर.सांगोला) यांचे बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून त्यांचे घरातील रोख रक्कम तसेच ३ ग्रॅम सोन्याचे कानातील दोन टॉप्स जोड, ७ ग्रॅम वजनाचे लहान मुलाचा कंबरेचा करदोडा (चैन) हे देखील आरोपी सुनिल मंडले याने चोरी केले बाबत कबुली देवून सोन्याचे दागिने काढुन दिले आहेत. सदरचे सोन्याचे दागिणे व मोटार सायकल असा सुमारे २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी नामे १. सुनिल मारुती मंडले (वय २६ वर्षे रा. पिंपरी खुर्द ता. आटपाडी सध्या रा. देवापूर ता. माण, जि. सातारा, २. शुभांगी रामचंद्र बुधावले (वय २६ वर्षे रा. निंबवडे, ता. आटपाडी) यांचेकडुन जप्त करण्यात आलेला आहे.
अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण ) प्रितमकुमार यावलकर (अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) विक्रांत गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा )पो.नि. भिमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. बाबासाहेब पाटील, पो.कॉ. लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पो.हे.कॉ. युसूफ पठाण यांनी मदत केली आहे.