सांगोला विधानसभा निवडणुकीत १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; तब्बल १९ उमेदवारांची माघार.

सांगोला /तालुका प्रतिनिधी
२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते पैकी सोमवार दिनांक ४/११/२४ रोजी एकुण १९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याचे माननीय निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी मुख्याधिकारी यांचे उपस्थितीमध्ये अर्ज माघारी घेण्यात आल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली आहे.
२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत ते खालील प्रमाणे…
१) दिपकआबा साळुंखे-पाटील.
२ ) शशिकांत गडहिरे.
३) शहाजीबापू पाटील.
४) डॉ. बाबासाहेब देशमुख.
५) राघू घुटुकडे
६) एकनाथ शेंबडे.
७) परमेश्वर गेजगे.
८) बाळासाहेब देशमुख.
९) बाळासाहेब नामदेव इंगोले.
१०) मोहन राऊत.
११) रणसिंह देशमुख
१२) राजाराम काळेबाग.
१३) ज्ञानेश्वर उबाळे.
सांगोला विधानसभा निवडणुकी मधून उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे:-
१) राजरत्न गडहिरे -अपक्ष.
२) संजय पाटील – अपक्ष
३) सोमा मोटे. – राष्ट्रीय समाज पक्ष
४ ) अनिल शेंडगे – राष्ट्रीय समाज पक्ष.
५ ) हरिश्चंद्र चौगुले- अपक्ष.
६) संग्रामसिंह पाटील. – अपक्ष.
७ ) किरण साठे. -अपक्ष
८) दत्तात्रय टापरे- अपक्ष.
९) धरती पवार -अपक्ष.
१० ) उमेश मंडले -अपक्ष.
११) मारुती जाधव – महाराष्ट्र राज्य समिती.
१२) विनोद बाबर. – अपक्ष
१३) संजय हाके.- अपक्ष
१४) गोविंद कोरे -अपक्ष.
१५) डॉ.अनिकेत देशमुख- अपक्ष
१६) सुदर्शन घेरडे.- बळीराजा पार्टी.
१७) अतुल पवार – अपक्ष.
१८) हरिदास वाळके (यादव) -अपक्ष
१९) धनाजी पारेकर – स्वराज्य निर्माण सेना.
या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचे मिडीया नोडल अधिकारी यांनी सांगितले आहे.