सोलापूर

कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी.

सोलापूर /प्रतिनिधी

दिनांक २०/११ /२०२४ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणूकीचे मतदान पार पडत असून मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूका या भयमुक्त व निर्भय वातारवरणात होण्यासाठी अवैध धंद्यावर कारवाई, अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई व इतर निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,प्रितम यावलकर (अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहेत.
सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांनी त्यांचेकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र, पैश्याची वाहतूक व दारूधंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून कारवाईसाठी रवाना केले होते. त्यामध्ये पथकांनी केलेली कामगिरी पुढील प्रमाणे.

१) मोहोळ पोलीस ठाणे २ गावठी पिस्टल जप्त दिनांक ०७.११.२०२४ रोजी पोउपनि रविराज कांबळे व त्यांचे पथकास इसम नामे सुरज जाधव हा शॉपींग सेंटरजवळ मोहोळ येथे आपले कब्जात देशी बनावटीचे गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांना मोहोळ सोलापूर रोडवरील शॉपींग मॉलजवळ सापळा लावून सदर इमसास ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करता त्याने मागील तीन महिन्यापूर्वी साहील बागवान, रा. मोहोळ याने त्याचेकडे ०२ गावठी पिस्टल दिले होते. परंतू ते दोन्ही पिस्टल परत साहील बागवान याचेकडे दिले असल्याचे सांगितले. त्यावरून साहील बागवान याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून अधिक तपास करता त्याने राहते घरातून ०२ गावठी पिस्टल किंमत रूपये १ लाख रूपयांचे काढून दिले आहेत. सदरबाबत १) सुरज खंडू जाधव (रा. यावली, ता. मोहोळ) २) साहील इक्बाल बागवान, (रा. बागवान नगर, मोहोळ) यांच्याविरूध्द मोहोळ पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी मा.श्री. सुरेश निंबाळकर, पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रविराज कांबळे, पोह प्रकाश कारटकर, विरेश कलशेट्टी, पोकों अजय वाघमारे, राहूल दोरकर, हरीश थोरात, अन्वर आतार, सुनिल पवार यांनी केली आहे.

२) अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणे १ गावठी कट्टा जप्त दिनांक ०६.११.२०२४ रोजी पोउपनि सुरज निंबाळकर यांचे पथक अक्कलकोट येथे असताना गोपनिय बातीमदार मार्फत धारसंग फाट्याजवळ एक इसम अवैध गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून सदर ठिकाणी जावून सापळा लावून सदर इसमास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचेकडे १ सिल्व्हर रंगाचे धातूचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ०२ जिवंत राऊड व एक मोबाईल असा एकूण ६०हजार ४००/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर प्रकरणी लक्ष्मण कांतप्पा शिंदे, (वय ३१ वर्षे, रा. धारसंग, ता. अक्कलकोट) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरूध्द अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणेस महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी मा.श्री. सुरेश निंबाळकर, पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुरज निंबाळकर, राजेश गायकवाड, पोह परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजय भरले, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, अशोल हलसंगी यांनी केली आहे.
मंद्रुप पो. ठाणे. हद्दीत १ लाख ६० हजार रोख रक्कम जप्त सपोनि नागनाथ खुणे यांचे पथक काल दिनांक ०६.११.२०२४ रोजी मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक इसम मोटार सायकल क्रमांक MH-१३AM-७४४६ वरून मोठ्या प्रमाणात रक्कम घेवून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे त्यास सापळा लावून पकडले असता इसम नामे जकीउल्ला अब्दुल कादर जमादार रा. (न्यू पाच्छा पेठ सोलापूर याचेकडे १ लाख ६० हजार रूपयांची रोख रक्कम मिळून आली आहे. त्याबाबत पुरावा वेळेत सादर न केल्याने सदरची रक्कम ही फिरते पथकांच्या समवेत जप्त करण्यात येवून मंद्रुप पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आली आहे.
ही कामगिरी मा.श्री. सुरेश निंबाळकर, (पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे, पोउपनि खाजा मुजावर, सहा. फौ. विजय पावले, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, अशोक हसलगी यांनी केली आहे.
मोहोळ पो. ठाणे हद्दीत १ लाख ४२ हजार रोख रक्कम जप्त दिनांक ०६.११.२०२४ रोजी पोउपनि सुबांध जमदाडे यांचे पथक मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दोन्ही बाजूला नंबर प्लेट नसलेल्या स्कूटीवरून २ इसम वेगात जात होते, त्यांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून इशारा करून थांबवले. त्यामध्ये इसम नामे विशाल दादाराव कापूरे, वय २५ रा. (कोळेगाव, ता. मोहोळ) व संदेश सुधीर काळे, वय २४ रा. काळे वस्ती, मोहोळ यांचेकडे १ लाख ४२ हजार रूपये रोख रक्कम मिळून आली. त्यांनी सदरची रक्कम बँकेतून काढली असल्याचे सांगितले परंतू बैंक स्टेटमेंट अथवा पुरावा सादर केला नाही. म्हणून सदरची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी मा.श्री. सुरेश निंबाळकर, पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुबोध जमदाडे, सहा. फौ. निलकंट जाधवर, पोह हरीदास पांढरे, आबासाहेब मुंडे यांनी केली आहे.
दिनांक ०६.११.२०२४ रोजी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात:-
१) मंद्रुप-१ लाख ६० हजार
२) मोहोळ १ लाख ४२, हजार
३) टेंभूर्णी २लाख
४) सांगोला ४ लाख १० हजार अशी एकूण ०९ लाख १२ हजार रूपये रोख रक्कम पोलीस विभागाकडून तर
६) पंढरपूर ग्रामीण १ लाख ७२ हजार ९८० रुपये
७) नातेपुते १ लाख ५० हजार
८) मंगळवेढा १ लाख ५० हजार
९) अक्कलकोट दक्षीण ३ लाख रुपये अशी एकूण ७ लाख ७२ हजार ९८० रूपये रोख रक्कम स्थिर तपासणी पथक व पोलीसांनी जप्त केली आहे.
५) मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत २ लाख १३ हजार६०० रूपयांचे गुळ मिश्रीत रसायन नष्ट करण्यात आले आहे दिनांक ०६.११.२०२४ रोजी पोउपनि रविराज कांबळे पथकाने मौजे भांबेवाडी, ता. मोहोळ येथील गिता दिपक काळे, रा. भांबेवाडी हिचे अवैध हातभट्टी निर्मातीच्या भट्टीवर पथकास छापा घातला असता तेथे २८ प्लॉस्टीक मध्ये ५ हजार ६०० लिटर गुळमिश्रीत रासयान व इतर भट्टीसाहीत्य मिळून आले. सदरचे रसायन हे जप्त करून जागीच नाश करण्यात आले आहे. याबाबत मोहोळ पोलीस ठाणेस दारूबंदी अधिनियमचे कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी मा.श्री. सुरेश निंबाळकर, पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रविराज कांबळे, पोह प्रकाश कारटकर, विरेश कलशेट्टी, पोकों अजय वाघमारे, राहूल दोरकर, हरीश थोरात, अन्वर आतार, सुनिल पवार यांनी केली आहे.
६) सोलापूर ता.पो. ठाणे हद्दीत १ लाख ३९ हजार २०० रूपयांचे गुळ मिश्रीत रसायन नाश दि.०७.११.२०२४ रोजी पोउपनि सुरज निंबाळकर यांचे पथकाने मौजे मुळेगाव तांडा येथील अवैध हातभट्टी निर्मीतीच्या भट्टीवर पथकास छापा घातला असता तेथे १८ प्लॉस्टीक मध्ये ३ हजार ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन व इतर भट्टीचे साहीत्य असे एकूण १ लाख ३९ हजार २०० रूपयेचा माल मिळून आले.
सदरचे रसायन हे जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले आहे. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे स म. दारूबंदी अधिनियमचे कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कामगिरी पोउपनि सुरज निंबाळकर, राजेश गायकवाड, पोह परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजय भरले, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, अशोल हलसंगी यांनी केली आहे.
आचार संहिता लागू झाल्यापासून अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), प्रितम यावलकर, (अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ) ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, (पो.नि.स्था.गु.शा) यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.
१) ३ गावठी पिस्टल, २९ तलवारी, ३ सुरे जप्त करून हत्यार अधिनियमचे ४ गुन्हे दाखल केले आहेत.
२) मोहोळ व मंद्रुप येथे माहितीवरून ३ लाख २ हजार रूपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
३) अवैध दारूनिर्मीती व विक्री करणारे १९लोकांवर गुन्हे दाखल करून ४३ लाख ८२ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त.
४) अक्कलकोट दक्षीण पो ठाणे हद्दीत गुटखा विक्रेत्यावर छापा घालून ८३ हजार ९०० रुपये चा माल जप्त केला.
५) जुगार अधिनियम अन्वये २ गुन्हे दाखल करून ११ हजार २००/- रूपये व जुगार साहीत्य जप्त केले आहे.

६) २ फरारी व ६ पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण यांच्याकडून मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!