Sangola

सांगोला शहराजवळ भीषण अपघात; दोघेजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी.

सांगोला / तालुका प्रतिनिधी

देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची भरधाव वेगाने जाणारी कार ला पाठीमागून मालट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास सोलापूर – सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास ता. सांगोला येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
सुखदेव बामणे (वय:४०) व नैनेश कोरे (वय:३१) दोघेही रा. नांदणी जि. कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे (वय-४२),रा.नांदणी ,सुधीर चौगुले- (वय-३५) रा.वडगाव ,सुरज विभुते-(वय-२१) रा.कोठली हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून , त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोड वरुन बाजूला काढून जखमींना उपचार करता तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफ.बी-३९ ०८ या वॅगनार कार मधून तुळजापूर येथे नवरात्री निमित्त देवीच्या दर्शनासाठी गेले होते दर्शनानंतर त्याच कारमधून पाच जण सोलापूर कडून हायवेने नांदणी जि. कोल्हापूर गावाकडे परत निघाले होते वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपास वर त्यांच्या भरधाव कारला पाठीमागून
डाळिंब घेऊन जाणाऱ्या १६ चाकी एम पी -२० झेड एम -९५१८ या माल ट्रकची जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!