आमदार शहाजीबापू पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देऊन कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देऊया: ज्योतीताई वाघमारे
सांगोला येथे शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान व महासंपर्क अभियानास हजारो महिलांची उपस्थिती.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून विकास साधला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार कोटीहून अधिक निधी आणला. महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केला आहे .
शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यामध्ये जलक्रांती करून पाणीदार आमदार असा नावलौकिक मिळवला हा तालुक्याचा सन्मान आहे. आगामी निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देऊन कॅबिनेट मंत्राची संधी देऊया असे आवाहन शिवसेना महिला प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांनी सांगोला येथे केले.
सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड, सांगोला येथे सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान व महासंपर्क अभियान मेळाव्याप्रसंगी शिवसेना महिला प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे बोलत होत्या. मेळाव्यातील महिला भगिनींना संबोधित करताना शहाजीबापू पाटील यांना निवडून देऊन मंत्री बनवण्याचे आवाहन केले. या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार शहाजीबापू पाटील हे होते.
पुढे बोलताना ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार कोटीहून अधिक निधी दिला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात व राज्यात राजकारण सांभाळले तर रेखाताई पाटील यांनी कुटुंबाचा संसार फुलविला. ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सांगोलाचा ढाण्या वाघ आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्याचा गौरव त्यामध्ये केला जाईल.” काय झाडी…काय डोंगर …काय हॉटेल…सर्वकाही एकदम ओके हाय. हा डायलॉग संपूर्ण जगात पोहोचवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी ८८३ कोटी रुपयांचा निधी आणून तालुक्यात जलक्रांती करण्याचा निर्णय घेतला.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी महिलांना प्रति महिना १ हजार ५०० रुपये देऊन खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. लाडकी बहीण हा शब्द व सन्मान खूप मोठा आहे . तालुक्यातील महिला मुख्यमंत्र्यांच्या व बापूंच्या बहिणी आहेत .आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगोला तालुक्यातुन रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्यासाठी आपले बहुमोल मत द्यावे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
आमदार शहाजीबापू पाटील यांना कॅबिनेट मंत्री बनवून लाल दिव्याच्या गाडीतून सांगोल्याला आणून त्यांचा सन्मान करूया. मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला तसेच अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिवर्षी ३ गॅस सिलेंडर देणे ,लाडकी बहीण योजनेसाठी प्रति महिन्यात १ हजार ५०० रुपये दिले. विरोधक लाडकी बहीण योजनेवर टीका करतात हा त्यांचा बालिशपणा आहे. मुख्यमंत्र्यांकडे चांगल्याचा सन्मान व चुकीला शासन असा न्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला मेळाव्याचे अध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, नवरात्रोत्सव हा महिलांचा सन्मान करणारा सण आहे .
मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून महिलांचा सन्मान केला. ऊस तोडी करणाऱ्या कामगारांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले .आमदार झाल्यापासून तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी रोजगार हमीची योजना आणली नाही . तालुक्याच्या विकासासाठीच संघर्ष चालू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना सन्मानाने प्रत्येक महिन्याला दिड हजार रुपये दिले ,जात आहेत. मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थाने गरिबीची जाणीव असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी वयोवृद्धासाठी वयोश्री योजना आणून ३ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे .तालुक्यात हरितक्रांती करण्याचे स्वप्न आहे. सांगोला तालुका प्रगतीपथावर नेण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी तयारी आहे .राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी व मला पुन्हा एकदा आमदार पदाची संधी देऊन राज्याचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी महिला मेळाव्याप्रसंगी सांगोला येथे केले.
यावेळी शिवसेनेच्या महिला तालुकाध्यक्षा राणीताई माने यांनी मुख्यमंत्र्यांनी बापूंच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जनतेसाठी शासनाच्या विविध योजना पोचवून तालुक्याचा विकास साधला .आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना आमदार व मंत्री बनवण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी मायाताई रणदिवे यांनी शहाजीबापू पाटील यांना सर्वांनी सहकार्य करावे , असे सांगत महिलांनी एक दिलाने बापूंना साथ देऊन बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यासाठी रेखाताई पाटील, शिवसेना शहरप्रमुख छायाताई मेटकरी, शिवसेना महिला शहर उपप्रमुख अप्सराताई ठोकळे ,शिवसेना महिला शहर समन्वयक शोभाकाकी घोंगडे, शोभाताई देशमुख, राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील , शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावलकर ,मा.पंचायत समिती सदस्य रूपालीताई लवटे, सरपंच शोभा कदम, शोभा पवार, दिपालीताई नलवडे, संगीताताई चौगुले ,आदी मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मुबीना मुलाणी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.