political

दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बामणी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.

 

सांगोला / तालुका प्रतिनिधी

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना बामणी ता. सांगोला गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील तसेच ज्येष्ठ नेते सदाशिव तात्या साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.     

    पक्षप्रवेश दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवार दि १२ रोजी बामणी ता. सांगोला येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते सदाशिव तात्या साळुंखे यांच्यासह उपसरपंच अर्जुन साळुंखे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्ता किंवा पद असो अथवा नसो राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे नेहमीच तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात शासन तसेच प्रशासनाकडे रखडलेली कामे मार्गी लावण्यात दिपकआबांचा हातखंडा आहे. सामान्य माणसासाठी सदैव झटणाऱ्या दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला असे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी बामणी गावचे माजी सरपंच शिवाजी चव्हाण, माजी सरपंच शिवाजी सुतार, तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर बिचुकले यांच्यासह नानासाहेब पाटील, सागर सरगर, भैया बिचुकले, राहुल पांढरे, महादेव माने, दत्तात्रय इंगोले, ज्ञानेश्वर महांकाळ, किशोर कदम, बाबासो साळुंखे, अक्षय चव्हाण, अमोल साळुंखे, सुनील पांढरे, चैतन्य चव्हाण, दत्ता माने, अनिल माने, कुमार माने, नामदेव बनसोडे, पोपट शेळके, वैभव कुलकर्णी, अजय जगताप, सागर दुर्योधन चव्हाण, विकास माने, गणेश कांबळे, तुकाराम गाडे, नागेश पिंटू बिचुकले, सचिन शिंदे, सोमनाथ साळुंखे, समर्थ माने, सागर गडदे, प्रणव माने, विशाल चव्हाण, गोविंद भोसले, हर्षद जवंजाळ, सुनील गाडे, प्रवीण बामणे, बालाजी नलवडे, एकनाथ इंगोले, हरी साळुंखे, किशोर बिचुकले, बिरजू इंगोले, अमोल कदम, संजय उबाळे, बलभीम चव्हाण, कुमार गवळी, संतु भोसले, बापू जाधव, गजानन जाधव, संदीप बनसोडे, विशाल जगताप, कृष्णा भोसले, भास्कर लोंढे, प्रफुल्ल सुतार, हनुमंत माने, सागर कांबळे तसेच सागर भोसले यांच्यासह बामणी गावातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 आबा फक्त एकदा उतराई होण्याची संधी द्या..!

आबा तुम्ही गेली ३० ते ३५ वर्ष निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने सांगोला तालुक्यातील जनतेची मनोभावे सेवा केली आहे. आजवर तुमच्यापर्यंत आलेल्या प्रत्येकाला तुम्ही न्याय दिला सांगोला तालुक्यातील प्रत्येकावर तुमचे कळत नकळत उपकार झाले आहेत. याची परतफेड करण्याची आपण एकदा संधी द्यावी आणि येणारी विधानसभेची निवडणूक लढवावी सांगोला तालुक्यातील तमाम जनता तुम्ही केलेल्या कामातून उतराई होण्यासाठी वाट बघत आहे अशी भावना सर्व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

—————————————————————————————————————————————————-

 कार्यकर्त्यांची प्रेम आणि विश्वास हेच भांडवल.!

वर्षानुवर्ष माझ्यासोबत जोडलेल्या आणि नव्याने साळुंखे – पाटील परिवारात दाखल होत असलेल्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि त्यांचे प्रेम हेच आपले भांडवल आहे. नागरिकांचे प्रेम आपल्याला दैनंदिन जीवनात काम करताना ऊर्जा देते आणि याच ऊरतून आपण येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. साळुंखे पाटील परिवारावर विश्वास ठेवणाऱ्या एकाही कार्यकर्त्याच्या अपेक्षेला तडा जाणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ ;

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!