निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करत अवैध धंद्यांवर कारवाई चा बडगा उगारणार :- पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे.
सोलापूर ग्रामीण व सांगली ग्रामीण पोलिसांची संयुक्त बैठक संपन्न.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक २०२४ ही शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व निवडणुक कार्यकाळात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस व सांगली जिल्हा पोलीस यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक १८/१०/२०२४ रोजी १२:०० वाजता. सिंहगड इन्स्टीटयुट, कमलापूर येथे पार पडली.
सदर बैठकीमध्ये सोलापूर व सांगली सीमाभागातील सराईत गुन्हेगार, फरार असलेले आरोपी यांना अटक करणे, अवैध व्यवसाय करणारे आरोपी दारु, गांजाची वाहतुक करणारे आरोपी व विक्री करणारे आरोपी यांच्यावर कारवाई करणे, तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सराईत आरोपी, गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तसेच सर्वांना सतर्क राहण्याच्या आवाहन यावेळी करण्यात आले आहे तसेच निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस व जनता यांच्यातील समन्वय वाढवून कम्युनीटी पोलीसींग वर भर देण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
सदरची मिटींग मा.श्री. अतुल कुलकर्णी, (पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण), मा. श्री. प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मिटींग करीता. विक्रांत गायकवाड, ( उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा), सुनिल साळुंखे, (उपविभागीय पोलीस अधिकारी जत.)विपुल पाटील, (उपविभागीय पोलीस अधिकारी विटा ), महेश ढवाण, ( पोलीस निरीक्षक मंगळवेढा), ज्योतीराम पाटील,( पोलीस निरीक्षक) कवठेमहंकाळ,श्री. बिजली, ( पोलीस निरीक्षक जत), संदीप कांबळे, स.पो.नि उमदी, जि. सांगली, रमेश जाधव, स.पो.नि आटपाडी, सचिन जगताप, स.पो.नि सांगोला,विनायक माहुरकर, पो.उप.नि सांगोला हे मान्यवर अधिकारी वर्ग या बैठकीसाठी उपस्थित होते.