आधी तुम्ही काय केले हे तपासा..मग मी काय केले हे विचारा: आमदार शहाजीबापू पाटील.
सांगोला येथे युवासेनेची भव्य मोटरसायकल रॅली व मेळावा संपन्न.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
१९९० पासून राजकीय जीवनाला सुरुवात झाली .माझी आमदारकी ही तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी व तालुक्याचा विकास करण्यासाठी सार्थकी लावत आहे. विरोधकांनी अनेक वर्ष आमदारकी भोगली. आधी तुम्ही काय केले हे तपासा ? मग मी काय केले हे विचारा असा सवाल बापूंनी व्यक्त केला.
माझे राजकारण हे जनतेच्या जीवावर आहे .मागच्या निवडणुकीला दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शेवटच्या क्षणाला साथ दिली. विरोधक म्हणतात बापू दमले ,पण मी दमणारा नेता नाही महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न व समस्या दुर करण्यासाठी मुख्यमंत्री १८ तास वेळ देतात. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गेलो नसतो तर तालुक्याच्या विकासासाठी ५ हजार पाचशे कोटी रुपये निधी येऊ शकला नसता. मी तालुक्याचा विकास सोडून एक क्षणभर ही थांबलो नाही.
तालुक्यातील प्रत्येक समाजाला प्रामाणिकपणे न्याय दिला आहे .तसेच तालुक्यात टेंभू ,म्हैसाळ, उजणी यासह इतर योजनांचे पाणी आणून शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला. भविष्यात सांगोल्यामध्ये एक एमआयडीसी आणून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे कार्य करायचे आहे. येत्या ५ वर्षात सांगोला तालुक्यासाठी १० हजार कोटी रुपये निधी आणून तालुका समृद्ध बनवायचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्यावी .
भविष्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व मला नामदार करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथे केले युवा सेनेच्या वतीने गुरुवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी दुपारी आयोजित केलेल्या मोटरसायकल रॅली व मेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून आमदार शहाजीबापू पाटील हे बोलत होते.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी व पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उद्याची २०२४ ची विधानसभा निवडणूक मोठ्या ताकतीने लढून आपले स्वप्न पूर्ण करा . मला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन आमदार व पुढे नामदार होण्याची संधी द्या .उद्याची पाच वर्षे ही महाराष्ट्राच्या विकासासाठीच आहेत. सांगोला येथे झालेला युवा सेनेचा मेळावा पाहून व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून नवचैतन्य निर्माण झाले आहे . तालुक्याच्या विकासासाठी मी केलेली कामे व निघालेले जीआर पाहून विरोधकांनी बोलावे मोगाम बोलू नये .तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,विजेचा प्रश्न ,रस्त्याचा प्रश्न ,प्रत्येक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेली कामे याचा विचार करता तालुक्यातील जनतेने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी या मेळाव्याच्या प्रसंगी बोलताना केले.
यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेनेचे नेते सुभाष इंगवले ,विजय शिंदे ,तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, दादासाहेब वाघमोडे सर,अजिंक्य पवार ,दिपक दिघे ,शंकर दुधाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ,येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू यांना निवडून आणण्यासाठी युवाशक्ती पुढे आली आहे .या ठिकाणी मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित नाही तर बापूंचा कार्यकर्ता म्हणून उपस्थित झालो आहे. एकनाथ शिंदे हे पाच वर्षे मुख्यमंत्री असते तर सांगोला तालुक्याला १० हजार कोटी रुपयांचा निधी बापूंनी आणला असता .बापूंच्या नेतृत्वामुळे शिवसेनेला ताकद मिळाली आहे .२३ नोव्हेंबरच्या मतमोजणीत बापू हे आमदार होतील . पुढे नामदार होतील. यासाठी सर्वांनी ताकद व शक्ती पणाला लावूया .३५ वर्षात आमदार शहाजीबापू पाटील यांनी कुटुंबाकडे लक्ष दिले नाही. परंतु सांगोल्याच्या विकासाकडे लक्ष दिले .सांगोल्यामध्ये शेतीच्या पाण्याच्या अनेक योजना आणल्या असून लवकरच तालुक्यात हरितक्रांती झाल्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे पिण्याच्या पाण्यासाठी शिरभावी पाणीपुरवठा योजना आणली. सध्या शासनाची हर घर जल ही योजना अस्तित्वात आली आहे त्यामुळे प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळेल. महाराष्ट्राला भविष्यात एकनाथ शिंदे यांच्याशिवाय व तालुक्याला आमदार शहाजीबापू शिवाय पर्याय नाही .
या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, युवासेना सचिव किरण साळी, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील ,विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, युवा नेते दिग्विजयदादा पाटील , युवा सेना संपर्कप्रमुख अभिजीत नलावडे,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील, तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे ,शिवसेना शहरप्रमुख माऊली केली, युवासेना शहर प्रमुख समीर पाटील , मागासवर्गीय सेलचे तालुका प्रमुख दिपक ऐवळे, प्रसिद्धीप्रमुख आनंद दौंडे, यांच्यासह संपर्क प्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे , जिल्हा प्रमुख महेश चिवटे ,बालाजी बागल, नाना मोरे ,युवासेना कार्याध्यक्ष प्रियांका परंडे, युवासेना नेत्या स्नेहा चवरे ,शिवाजी घेरडे,आनंद घोंगडे ,सुनील पाटील यांच्यासह सांगोला तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
होलार समाजासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होलार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून जीआर समाजाच्या हाती दिला. त्याबद्दल होलार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.
सांगोला येथे सुमारे ४ हजार शिवसेना व युवासेना पदाधिकारी ,कार्यकर्त्यांची भव्य अशी मोटरसायकल रॅली पंढरपूर रोड वरून सांगोला शहरात दाखल झाली . मान्यवरांच्या हस्ते शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून रॅली सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला येथे आली. त्यानंतर युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला . मिरज रोड येथे रॅलीमध्ये जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली. या रॅलीची सांगोला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.