crime

सांगोला तालुक्यातील सोनंद येथे भीषण अपघात; २ ठार.

सांगोला / प्रतिनिधी)

   डेअरीला दुध घालून घराकडे परतणाऱ्या दुचाकीस समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
हा अपघात बुधवार २३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास सांगोला- जत रोडवरील सोनंद (चव्हाण मळा) येथे घडला. आनंदराव चव्हाण (वय ५५ रा. सोनंद.ता.सांगोला) व सागर गळवे (वय २४ रा. सोनंद ता. सांगोला) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत.
    या अपघातात मरण पावलेले आनंदराव चव्हाण व सागर गळवे असे दोघेजण मिळून बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता सोनंद गावात डेअरीला दूध घालून दुचाकीवरून सोनंद गावाकडून जत रोडने लक्ष्मीनगर घराकडे परत निघाले होते. नेमके त्यावेळेस जत कडून भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला लक्ष्मीनगर जवळ समोरून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात आनंदराव चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. तर सागर गळवे गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्यास बेशुद्ध अवस्थेत सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सागर गळवे यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!