political

पुढील पाच वर्षे जनतेचा सालगडी म्हणून काम करणार;दिपकआबा साळुंखे पाटील यांचं मतदारांना अभिवचन

सांगोला : तालुका प्रतिनिधी

गेली २५ वर्षे आघाडीच्या राजकारणात शेकापला सर्वतोपरी मदत केली. स्व.गणपतराव देशमुख यांनी, माझी शेवटची निवडणुक आहे असे सांगितल्याने २०१४ च्या निवडणुकीत त्यांना मदत केली. २०१९ च्या निवडणुकीत शहाजीबापूंनी एकवेळ मदत करा, पुढच्या वेळी मी तुम्हाला मदत करतो असे सांगितल्याने त्यांनाही मदत केली. पण यंदा दोघांनीही मला मदत करण्यास नकार दिला. जनतेचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे. वारस हा कर्तृत्वाने सिद्ध होतो. सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाला काकासाहेबांनी पहिल्यांदा वाचा फोडली. गेल्या ५० वर्षात कधी हक्काचे पाणी मिळाले नाही. हक्काच्या पाण्यासाठी किती दिवस लढा द्यायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकवेळ जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, पुढील पाच वर्षे जनतेचा सालगडी म्हणून काम करणार असल्याचं अभिवचन दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मतदारांना दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील एखतपूर गावात प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी.झपके म्हणाले की, दिपकआबांनी गेल्यावेळी जुन्या मित्राला मदत केली, जिवाचं रान केलं अन् शहाजीबापूला विजयी केलं. दिपकआबांमुळे आमदारकीचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं, त्या शेकापसह शहाजीबापू देखील दिपकआबाला न्याय देवू शकले नाहीत. आता दिपकआबाला न्याय देण्याची जबाबदारी मतदारांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी.झपके, माजी सरपंच सदाशिव नवले, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अंकुश रामचंद्र इंगोले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, सचिन उबाळे, तुषार इंगळे, दादासो इंगोले, जालिंदर इंगोले, रावसाहेब बबनराव पाटील, मोहन इंगोले, नेताजी इंगोले, दत्तात्रय इंगोले, मच्छिंद्र इंगोले, विठ्ठल इंगोले, आनंद फाटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!