सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष एस.पी. अतुल कुलकर्णी सर्वोत्तम.!

सोलापूर / विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी घोषित करण्यात आले आहेत.
यामध्ये सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सर्वोत्तम पोलीस अधीक्षक ठरविण्यात आले आहे.
शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात ५ मंत्रालयीन विभागांचे सचिव, ५ मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,५ जिल्हाधिकारी, ५ पोलिस अधीक्षक, ५ मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), ४ महापालिका आयुक्त, ३ पोलिस आयुक्त, २ विभागीय आयुक्त आणि २ पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी जाहीर केली.
यावेळी ते म्हणाले की ही नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. तसेच या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पाच पोलीस अधीक्षकांमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय अग्रेसर ठरले आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे काम राज्यात ४ क्रमांकावर लक्षवेधी ठरले आहे. त्यांना सर्वोत्तम पोलीस अधीक्षक म्हणून गौरवण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.