Sangola

सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण १हजार २८१ पोस्टल मतदान.

   सांगोला प्रतिनिधी – २५३ सांगोला विधानसभा मतदारसंघात तहसील कार्यालयात दिनांक १२/११ ते १८/११/२४ रोजी पर्यत एकूण १ हजार २८१ मतदान पूर्ण झाल्याचे आहे त्यामध्ये सांगोला ९७५, जिल्ह्यातील २०० व जिल्हा बाहेरील १०६ मतदान झाले आहे या पोस्टल मतदानाची प्रक्रिया दि.१२/११/२४ पासुन सांगोला तहसील कार्यालयात सुरू झालेली होती.
       पोस्टल मतदान करण्यासाठी तहसील कार्यालय येथे पोस्टल मतदान साक्षांकन करण्यासाठी राजपत्रित अधिकारी वसंत फुले सहाय्यक गटविकास अधिकारी व प्रकाश नालवार उपनिबंधक यांची नेमणूक केली आहे तसेच मतदान केंद्राध्यक्ष संतोष लोंढे व सुभाष रोकडे तसेच मतदान अधिकारी उत्तम नवले यांची नियुक्ती केले असून त्या ठिकाणी २५३ विधानसभासाठी १ व जिल्हा अंतर्गत विधानसभासाठी १ व जिल्हा बाहेरील विधानसभा साठी १ मत  मतपेटी ठेवलेल्या  आहेत या ठिकाणी आज एकूण १ हजार २८१ मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!