
सांगोला/ प्रतिनिधी
सांगोला विधानसभा निवडणुकीची तहसिल कार्यालयाकडून जोरदार तयारी सुरु आहे मतदानासाठी मशिन सिलींग प्रक्रिया दिनांक ११/११/२०२४ व १२/११/२०२४ या दोन दिवशी सुरू असलेली प्रक्रिया आज पूर्ण झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी सांगीतले आहे.
सांगोला २५३ विधानसभा मतदार संघासाठी ३०९ मतदान केंद्र असुन त्यासाठी ३७२ बि यु, ३७२ सि.यु.व ४०२ व्ही.व्ही.पॅट मशीन उपलब्ध असुन सर्व केंद्रावर मतदानासाठी मशिन सिलींग करुन मतदानासाठी सज्ज ठेवलेल्या आहेत. व ६३ मशिन रिझर्व साठी सज्ज ठेवलेल्या आहेत.
मतदान मशिन सिलींग करण्याचे कामासाठी झोनल ऑफीसर, तलाठी व कोतवाल या प्रमाणे तिघांची टिम नेमन्यात आली असुन त्यासाठी ३४ टेबल ठेवण्यात आले आहेत बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्ही.व्ही.पॅट पेअरींग केल्या नंतर एकूण ३७२ मशिन स्ट्रॉग रुम मध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्याचे तहसिलदार संतोष कणसे यांनी सांगीतल्याचे मिडीया नोडल अधिकारी मिलींद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी माहिती दिली आहे.