Sangola
नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या धडक कारवाया सुरूच; नाकेबंदी करून वाहनांची तपासणी.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पदभार घेतल्यापासून कारवाईचा धडाका लावला आहे सांगोला शहरात पायी चालत पेट्रोलिंग करून वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले तसेच काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दि.२४ एप्रिल रोजी सांगोला शहरात नाकेबंदी करून वाहनांची कसोशीने तपासणी केली या कारवाईमध्ये २० वाहनांवर कारवाई करून १७ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला.
नूतन पोलीस निरीक्षक घुगे यांच्या या धडक कारवायांमुळे बेशिस्त वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे.