“काय झाडी”…”काय गार्डन”…”काय खणदाळे साहेब”… सगळं काही “ओके” मध्ये हाय.!

सांगोला / विशेष प्रतिनिधी
शासकीय सेवा बजावत असताना अनेक अधिकारी सांगोला येथे आले व आपल्या कार्यकाळात त्यांच्या कार्यपद्धतीने विविध अशी कामगिरी करून जनसामान्यांच्या मनामध्ये आपली प्रतिमा ठळकपणे उमटवून गेले मात्र त्याहून पुढे जाऊन आपल्या कर्मभूमीला अर्थात सांगोला पोलीस ठाण्याला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे हेतूने तसेच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पर्यावरण प्रेमी व्यक्तिमत्त्वाला अनुसरून त्यांचे आदर्श घेत खणदाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्यामध्ये ऑक्सिजन पार्क उभारण्यात आले आहे तर सांगोला पोलीस ठाण्यातील सर्वच विभागांना रंगरंगोटी केल्याने पोलीस स्टेशनच्या इमारतीला अतिशय सुंदर असे देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे ज्याप्रमाणे इमारत देखणी आहे त्याप्रमाणे इमारतीमधील कामकाज देखील खणदाळे साहेबांनी अतिशय पारदर्शक केला असल्याची जनभावना समोर येत आहे.
कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेबांचे सोलापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनची वार्षिक दप्तर तपासणी सुरू झाली असून सांगोला येथील दप्तर तपासणीच्या निमित्ताने फुलारी साहेब सांगोला येथे येणार आहेत.
निमित्त जरी दप्तर तपासणीचे असले तरी खणदाळे साहेबांची इच्छाशक्ती आणि सांगोला पोलीस स्टेशन ही माझी कर्मभूमी असल्याची प्रामाणिक भावना मनात बाळगून गेल्या वर्षभरापासून खणदाळे साहेबांनी लोकाभिमुख पोलिसिंग करत सांगोला तालुक्यातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.गत वर्षभरामध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये खणदाळे साहेबांनी त्यांच्या कार्यपद्धतीची चुणूक दाखवून दिली व तालुक्यात अतिशय शांततेने निवडणुका पार पडल्या यासह अशी अनेक उदाहरण देता येईल की खणदाळे साहेबांनी कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावली आहे साहेबांच्या कार्यपद्धतीमुळे पोलीस प्रशासना बाबत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात सकारात्मकता वाढीस लागल्याचे पाहायला मिळत आहे.
वरील काही शब्दातून वर्णन केल्यानंतर सांगोला तालुक्याचे लोकप्रिय नेत्यांच्या सर्वत्र गाजलेल्या डायलॉग नुसार वर्णन करायचेच झाले तर “काय झाडी,काय गार्डन, काय खणदाळे साहेब.. सर्व काही ‘ओके’ मध्ये हाय…असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.!