crime

पंढरपुर शहर पोलीस ठाणे “गुन्हे प्रकटीकरण शाखेची” धडाकेबाज कामगीरी.

देशी बनावटीच्या पिस्टलसह आरोपीस केले जेरबंद.

पंढरपूर / प्रतिनिधी

दि. ०६ नोव्हेंबर २०२४ रोजी ५:०० वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकासह पो. ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना गुप्त बातमीदाराकरवी माहिती प्राप्त झाली की, शहरातील जुना अकलुज रोड, जॅकवेल, इसबावी येथे एक इसम हा त्याचे जवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर बाळगुन फिरत आहे.
सदर बातमी बाबत वरिष्ठांना हकीकत सांगून सदर प्राप्त माहितीची खातरजमा करुन कारवाई करणेकामी पथक तात्काळ रवाना केले सदर ठिकाणी सापळा रचून संशईत इसम नामे महम्मद युसुफ पठाण (वय-२७ वर्ष, रा. खंडाळी ता. माळशिरस, जि. सोलापूर) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झीनसह मिळून आले ते पुढील कारवाई कामी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग पंढरपूर, अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके, यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, पोहेकॉ सुरज हेंबाडे, पोहेकॉ प्रसाद औटी, पोहेकॉ सिरमा गोडसे, पो.हे.कॉ सचिन हेंबाडे, पो.हे.कॉ नितीन पलुसकर, पोहेकॉ विठ्ठल विभुते, पो.हे.कॉ दादा माने, पो.कॉ बजरंग बिचुकले, पो.कॉ. समाधान माने, पो.कॉ शहाजी मंडले, पो.कॉ निलेश कांबळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सिरमा गोडसे हे करीत असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्या कडून मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!