सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या.
सोलापूर जिल्ह्यातील घरफोडीचे एकूण १५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश.

सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी व अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालून योग्य ती प्रतिबंध करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सुरेश निंबाळकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून जिल्हयातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स.पो.नि नागनाथ खुणे व त्यांचे पथक असे मोहोळ शहरात हजर असताना पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमी मिळाली की, मंगळवेढा पोलीस ठाणे येथील असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक उर्फ आशिका-या काळे रा. गायकवाड वस्ती, मोहोळ याने त्याचे इतर साथीदारांनी मिळून केला असून तो सद्या मोहोळ येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स.पो.नि नागनाथ खुणे यांनी पथकासह त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपूस करता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ आशिका-या छपरू काळे (वय ३५ वर्षे रा. भंडारकवठे ता. दक्षिण सोलापूर हल्ली रा. नाईकवाडी प्लॉट, मोहोळ) असे असल्याचे सांगितले. त्यास मंगळवेढा पोलीस ठाणे कडील सप्तश्रृंगीनगर येथील घरफोडी चोरीच्या गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. त्यावरुन अधिक संशय आल्याने त्यास विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण विचारपूस करून तपास करता त्याने सांगितले की, मागील सात ते आठ महिन्यापुर्वी त्याने त्याचे इतर साथीदारासोबत मंगळवेढा शहरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याचे सांगितले. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याचेकडे इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने सांगितले की, मागील वर्षभरात त्याने त्याचे साथीदार यांचेसोबत मंगळवेढा शहरात, बठाण,मंद्रुप, मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, दोड्याळ, कोंडी, हिरज इ. ठिकाणी घरफोड्या चो-या केल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी एकुण २७५.५ ग्रॅम (सुमारे २८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (बाजारमुल्य भावाप्रमाणे) एकुण १९ लाख २८ हजार ५०० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, राजेश गायकवाड, सफौ नारायण गोलेकर, पोह/ धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मपोह / मोहिनी भोगे, पोकों/सागर ढोरेपाटील, पोकॉ/ अक्षय डोंगरे, यश देवकते, योगेश जाधव, समर्थ गाजरे, चापोना / समीर शेख, यांनी बजावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर यांच्या कडून मिळाली आहे.