आरेवाडी येथे गुरुवारी बहुजनांचा दसरा मेळावा.
मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा- दादासाहेब लवटे

सांगोला / तालुका प्रतिनिधी
बहुजनांचा दसरा मेळावा गुरुवार दिनांक १० ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता बिरोबा बन, आरेवाडी ता. कवठेमहांकाळ जि सांगली येथे आयोजित केला असल्याची माहिती युवा नेते दादासाहेब लवटे यांनी दिली.
सदर मेळाव्यास आमदार गोपीचंद पडळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. दसरा मेळावा हा केवळ सण नाही तर बहुजन समाजाच्या हक्कासाठीचा संघर्ष आहे. सामाजिक बदलाची दिशा या मेळाव्यातून मिळते. श्री बिरोबा देवाचे दर्शन व मेळावा हा दुग्ध शर्करा योग आहे महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक विषयांवर विचार मंथन होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असून या मेळाव्यातून धनगर व इतर सर्व बहुजन समाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे श्री दादासाहेब लवटे यांनी सांगितले.
तरी बहुजनांच्या दसरा मेळाव्यासाठी सांगोला शहर तालुका व परिसरातील बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील श्री.लवटे यांनी केले आहे.